Corona Update | राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 77 हजार पार, 33,681 रुग्ण बरे, 41,393 बाधितांवर उपचार सुरु

राज्यात दिवसभरात 1 हजार 352 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे (Maharashtra Corona Update). त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Corona Update | राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 77 हजार पार, 33,681 रुग्ण बरे, 41,393 बाधितांवर उपचार सुरु

मुंबई : राज्यात दिवसभरात 1 हजार 352 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे (Maharashtra Corona Update). त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 33 हजार 618 रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. याशिवाय राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 77 हजार 793 वर पोहोचला आहे, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे (Maharashtra Corona Update).

राज्यात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी नव्या कोरोनाबाधितांची संख्या दररोज वाढत आहे. राज्यात आज दिवसभरात 2 हजार 933 नवे रुग्ण आढळले आहे. सध्या 41 हजार 393 रुग्णावर उपचार सुरु आहे, अशी माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत 2710 रुग्णांचा मृत्यू

राज्यात आज दिवसभरात 123 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये 85 पुरुष तर 38 महिला रुग्णांचा समावेश आहे. आज नोंद झालेल्या 123 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 71 रुग्ण आहेत तर 44 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 8 जण 40 वर्षांखालील आहेत. या 123 रुग्णांपैकी 92 जणांमध्ये ( ७५ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 2710 वर पोहोचली आहे.

मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा 44 हजार 931 वर

राज्यातील एकूण रुग्णांपैकी मुंबईत सर्वाधिक रुग्ण आहेत. मुंबईत  आज दिवसभरात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत 1 हजार 439 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे मुंबईतील बाधितांची संख्या 44 हजार 931 वर पोहोचली आहे. मुंबईत दिवसभरात आज 48 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील कोरोना बळींची संख्या 1465 वर पोहोचली आहे. मुंबई पाठोपाठ पुणे, ठाणे, औरंगाबाद, सोलापूर अशा विविधा भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे.

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई92988648725288
पुणे (शहर+ग्रामीण)39125164271097
ठाणे (शहर+ग्रामीण)61869264891646
पालघर 97444817188
रायगड84593731159
रत्नागिरी87060130
सिंधुदुर्ग2572055
सातारा170998168
सांगली59733015
नाशिक (शहर +ग्रामीण)70803847290
अहमदनगर (शहर+ग्रामीण)84852420
धुळे151783576
जळगाव 58103336345
नंदूरबार 27914911
सोलापूर39782076344
कोल्हापूर 112380720
औरंगाबाद82174042338
जालना98350647
हिंगोली 3412762
परभणी2001015
लातूर 66432533
उस्मानाबाद 38123414
बीड2201055
नांदेड 57225124
अकोला 1875146892
अमरावती 82361336
यवतमाळ 42428014
बुलडाणा 39920616
वाशिम 1731044
नागपूर2022136621
वर्धा 34141
भंडारा162890
गोंदिया 2101563
चंद्रपूर164960
गडचिरोली115661
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)195031
एकूण2,54,4271,40,32510,289
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *