Wardha Corona | अमरावती ते वर्धा दूध टँकरमधून प्रवास, परिचारिकेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

या तरुणीचा कोव्हिड-19 अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आल्याने तिला अमरावती येथील कोव्हिड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Wardha Corona | अमरावती ते वर्धा दूध टँकरमधून प्रवास, परिचारिकेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

वर्धा : अमरावती येथील एका खासगी रुग्णालयात (Wardha Nurse Infected By Corona) परिचारिका म्हणून काम करणारी तरुणी दुधाच्या टँकरने तळेगाव जवळच्या काकडदरा पुनर्वसन येथे मंगळवारी पोहोचली. या तरुणीचा कोव्हिड-19 अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आल्याने तिला अमरावती येथील कोव्हिड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. या तरुणीचा स्वॅब अमरावती जिल्ह्यातच घेण्यात (Wardha Nurse Infected By Corona) आला होता.

22 वर्षीय तरुणी अमरावती येथील एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करते. अमरावतीत ती भाड्याच्या खोलीत राहायची. घरमालकाने खोली रिकामी करुन मागितल्याने या तरुणीने मूळ गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला.

यापूर्वी तरुणीचा स्वॅब अमरावती येथे घेण्यात आला असून तो तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्यानंतर ही तरुणी दुधाच्या टँकरने तळेगावजवळच्या काकडदरा येथे मंगळवारी पोहोचली. गावात पोहोचल्यानंतर तिला आणि तिच्या कुटुंबियांना होम क्वारंटाईन करण्यात आलं. दरम्यान, बुधवारी (3 जून) या तरुणीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. ही माहिती मिळताच तिला रुग्णवाहिकेतून तातडीने अमरावती येथील कोव्हिड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले (Wardha Nurse Infected By Corona).

तळेगाव आणि काकडदरा गाव सील

या तरुणीच्या संपर्कात कोण-कोण आलं होतं, याचा शोध सध्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतला जात आहे. कुठल्याही सक्षम अधिकाऱ्याची परवानगी न घेता वर्धा जिल्ह्यातील काकडदरा गावात आलेल्या या तरुणीची आई अंगणवाडी सेविका असल्याची माहिती आहे. तर ज्या वाहन चालकाने या तरुणीला काकडदरापर्यंत आणले, त्याच्या घराचा परिसर पोलीस प्रशासनाने सील केला (Wardha Nurse Infected By Corona) आहे. तसेच, तळेगाव आणि काकडदराही सील करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या :

मुंबईत कोरोना चाचण्या 50 टक्क्याहून कमी, मृतांची संख्या वाढली, फडणवीसांचं मुख्यंत्र्यांना पत्र

नाशिकमध्ये कोरोनाचं थैमान, दिवसभरात 58 रुग्णांची वाढ, कोरोनाबाधितांचा आकडा 1356 वर

संकटकाळात महाराष्ट्र एक, मुंबईसह महाराष्ट्राचे रक्षण करणाऱ्यांचे आभार : मुख्यमंत्री

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *