वर्ध्यात विलगीकरणातील व्यक्ती रुग्णालयातून पळाला, गावात फिरताना आढळला, गुन्हा दाखल

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असलेल्या व्यक्तीने जिल्हा सामान्य रुग्णालयातून उपचारादरम्यान पळ काढला.

वर्ध्यात विलगीकरणातील व्यक्ती रुग्णालयातून पळाला, गावात फिरताना आढळला, गुन्हा दाखल

वर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Wardha Corona Quarantine Update ) असलेल्या व्यक्तीने जिल्हा सामान्य रुग्णालयातून उपचारादरम्यान पळ काढला. या घटनेमुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पोलीस विभागाची चांगलीच दमछाक झाली. अखेर या व्यक्तीला रोठा गावातून ताब्यात घेण्यात (Wardha Corona Quarantine Update ) आले.

कोरोना विषाणूला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्याच्या सीमादेखील बंद करण्यात आल्या आहेत. तरीही अनेकजण जिल्ह्यात प्रवेश घेत आहेत. जिल्ह्यात दाखल झालेल्या एका व्यक्तीला 14 दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्यात आलं होतं. मात्र, ही व्यक्ती क्वारंटाईनच्या नियमांचे उल्लंघन गावात सर्रास फिरत होता.

याबाबतच्या तक्रारी आरोग्य विभागाकडे आल्या. त्यानंतर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी या व्यक्तीची आयटीआय टेकडी परिसरात संस्थात्मक विलगीकरणात रवानगी केली. संस्थात्मक विलगीकरणात असताना रविवारी त्या व्यक्तीची प्रकृती बिघडल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मात्र, या व्यक्तीने सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान तेथून पोबारा केला. या घटनेने वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पोलीस विभागाची चांगलीच तारांबळ उडाली. पोलीस या व्यक्तीच्या शोधात लागले (Wardha Corona Quarantine Update). अखेर ही व्यक्ती पुन्हा एकदा गावात फिरताना दिसून आली. याप्रकरणी नोडल अधिकारी साधना कोठेकर यांच्या तक्रारीहून सावंगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 74 हजार 860 वर 

राज्यात आज (3 जून) कोरोनाच्या रुग्णांमध्ये 2,560 नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर दिवसभरात 996 रुग्ण बरे झाले आहेत. यासह महाराष्ट्रातील कोरोनाबधितांचा आकडा 74 हजार 860 वर पोहोचला आहे. यापैकी 32 हजार 329 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 39 हजार 935 सक्रिय कोरोना रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. राज्यात आज 122 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबळींची संख्या आता 2 हजार 587 वर पोहोचली आहे.

Wardha Corona Quarantine Update

संबंधित बातम्या :

नाशिकमध्ये 22 नव्या कोरोना रुग्णांची वाढ, एकूण बाधितांचा आकडा 1,315 वर

जालन्यात कोरोना संशयिताचा अंत्यविधी, मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह, अंत्यविधीला उपस्थित 100 जणांवर गुन्हा दाखल

औरंगाबादमध्ये अनलॉक 1 ची अंमलबजावणी, कोरोना संसर्गाची स्थिती काय?

कोरोनाची लस विकसित करण्यासाठी 30 माकडांवर प्रयोग, वनमंत्र्यांकडून माकडं उपलब्ध करुन देण्याचे निर्देश

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *