जालन्यात कोरोना संशयिताचा अंत्यविधी, मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह, अंत्यविधीला उपस्थित 100 जणांवर गुन्हा दाखल

जालन्यात कोरोनाबाधित वृद्धाच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणाऱ्या तीन नगरसेवकांसह 90 ते 100 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जालन्यात कोरोना संशयिताचा अंत्यविधी, मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह, अंत्यविधीला उपस्थित 100 जणांवर गुन्हा दाखल

जालना : जालन्यात कोरोनाबाधित वृद्धाच्या अंत्यसंस्काराला उपस्थित (Jalna Corona Suspect Funeral) राहणे अनेकांना महागात पडले आहे. याप्रकरणी तीन नगरसेवकांसह 90 ते 100 जणांच्या जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला (Jalna Corona Suspect Funeral) आहे.

जालना शहरातील मोदीखाना येथील वृद्धाचे 1 जून रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर जिल्हा सरकारी रुग्णालयाने या वृद्धाचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवले होते. त्यांच्या स्वॅब तपासणीचा अहवाल येण्यापूर्वीच जालना शहरातील एका स्मशानभूमीत त्यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम उरकण्यात आला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या नियमानुसार 20 लोकांनी एकत्र येणे आणि सोशल डिस्टन्स ठेवणे अपेक्षित होतं. मात्र हे माहीत असतानाही आदेशाचे उल्लंघन करत 90 ते 100 जणांनी या अंत्यविधीला उपस्थिती दर्शवली.
अंत्यविधीच्या दुसऱ्या दिवशी मयत व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला (Jalna Corona Suspect Funeral).

सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या फिर्यादीवरुन अंत्यसंस्कारास उपस्थित राहणाऱ्या 90 ते 100 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जालन्यात कोरोनाचे 159 रुग्ण

जालन्यात कोरोनाचे 6 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या 159 वर पोहोचली आहे.

जालना शहरातील मोदीखाना भागातील 4, मंठातील 1, खासगी हॉस्पिटलमधील कर्मचारी म्हाडा कॉलनीतील 1 अशा एकूण सहा संशयित रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक मधुकर राठोड यांनी ही माहिती दिली.

Jalna Corona Suspect Funeral

संबंधित बातम्या :

कोरोनाची लस विकसित करण्यासाठी 30 माकडांवर प्रयोग, वनमंत्र्यांकडून माकडं उपलब्ध करुन देण्याचे निर्देश

औरंगाबादमध्ये अनलॉक 1 ची अंमलबजावणी, कोरोना संसर्गाची स्थिती काय?

वर्ध्यातील 21 वर्षीय कोरोनामुक्त तरुणीचा मेंदूज्वराने मृत्यू

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *