AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादमध्ये अनलॉक 1 ची अंमलबजावणी, कोरोना संसर्गाची स्थिती काय?

एकिकडे औरंगाबाद शहरात कोरोनाचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. दुसरीकडे देशभरात लॉकडाऊनमध्ये सूट देत अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे (Aurangabad Corona updates after Unlock 1).

औरंगाबादमध्ये अनलॉक 1 ची अंमलबजावणी, कोरोना संसर्गाची स्थिती काय?
| Updated on: Jun 02, 2020 | 7:42 PM
Share

औरंगाबाद : एकिकडे औरंगाबाद शहरात कोरोनाचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. दुसरीकडे देशभरात लॉकडाऊनमध्ये सूट देत अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे (Aurangabad Corona updates after Unlock 1). त्यामुळे औरंगाबाद शहरात परिस्थिती आणखी बिघडू शकेल अशी चिंता शहरातील नागरिक व्यक्त करत आहेत. तब्बल 2 महिन्यांचा लॉकडाऊन संपल्यानंतर औरंगाबाद शहरात अनलॉक 1 च्या पार्श्वभूमीवर अनेक उद्योग व्यवसायांना सुरुवात झाली. यामध्ये दारु दुकानांचाही समावेश आहे. राज्याच्या इतर भागात दारु दुकाने यापूर्वीच सुरु झाली होती. मात्र, औरंगाबाद शहरात 1 जूनपासून दारु दुकानांना सुरुवात झाली आणि दारुच्या दुकानांसमोर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली.

शहराच्या इतरही परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. औरंगाबाद शहरात यापूर्वी फक्त दुपारी 2 वाजेपर्यंत खरेदीसाठी मुभा दिली जात होती. मात्र ‘अनलॉक वन’मध्ये ही दुकानं दिवसभर सुरु ठेवण्याची मुभा मिळाली. त्यामुळे दुकानामध्ये खरेदीसाठी आणि त्याचबरोबर रस्त्यावर ये जा करणाऱ्यांचीही गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे औरंगाबाद शहरातील रस्ते गर्दीने फुलून गेले होते. दुसऱ्या बाजूला औरंगाबाद शहरातील कोरोनाचा धोका अद्यापही काही कमी झालेला नाही. औरंगाबाद शहरात आज सकाळी आलेल्या पहिल्या रिपोर्टमध्ये तब्बल 55 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे एकूण कोरोना बाधितांचा आकडा 1 हजार 642 वर जाऊन पोचला. ही वाढ अशीच कायम राहिली तर येत्या 5 दिवसात औरंगाबाद शहरातील कोरोना बाधितांचा आकडा 2 हजारांच्या पूढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये दिलेली सूट अनेकांना जीवघेणी वाटत आहे.

औरंगाबाद शहरात अनलॉक वन सुरु झालं असलं, तरी शहरात अनेक निर्बंध अजूनही कायम आहेत. अतिमहत्वाच्या आणि जीवनावश्यक वस्तूंशिवाय इतर दुकाने चालू ठेवण्यास अद्याप परवानगी नाही. जिल्ह्यात सुरु केलेल्या बसेसला अजूनही औरंगाबाद शहरात प्रवेश दिला जात नाही. फिजीकल डिस्टन्सिंग आणि मास्क वापरण्याची अट कायम ठेवली आहे. असं असलं तरीही औरंगाबाद शहरातील कोरोना बाधितांचे आकडे कमी होतील का हा खरा प्रश्न आहे.

संबंधित बातम्या :

आरोग्यमंत्र्यांकडून मध्यरात्री 2 पर्यंत खासगी रुग्णालयांची झाडाझडती, मुंबईतील 4 रुग्णालयांना नोटीस

नाशिकमध्ये 24 तासात 43 कोरोना रुग्ण, कोरोनामुक्त झालेल्या पोलीस जमादाराचा 4 दिवसात ह्रदय विकाराने मृत्यू

‘केईएम’मधून बेपत्ता वृद्ध कोरोनाग्रस्ताचा मृतदेह सापडला, हॉस्पिटलच्याच शवागारात 15 दिवसांनी शोध

नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या 571 वर, गड्डीगोदाम, नाईक तलाव नवे हॉटस्पॉट!

Aurangabad Corona updates after Unlock 1

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.