नाशिकमध्ये 24 तासात 43 कोरोना रुग्ण, कोरोनामुक्त झालेल्या पोलीस जमादाराचा 4 दिवसात ह्रदय विकाराने मृत्यू

जिल्ह्यात मागील 24 तासात 43 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. यासह नाशिक जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1 हजार 255 इतकी झाली आहे (Corona Updates of Nashik Malegaon).

नाशिकमध्ये 24 तासात 43 कोरोना रुग्ण, कोरोनामुक्त झालेल्या पोलीस जमादाराचा 4 दिवसात ह्रदय विकाराने मृत्यू

नाशिक : जिल्ह्यात मागील 24 तासात 43 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. यासह नाशिक जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1 हजार 255 इतकी झाली आहे (Corona Updates of Nashik Malegaon). यापैकी 846 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. सध्या जिल्ह्यात 336 कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

आतापर्यंत नाशिकमध्ये 73 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात मालेगावमधील 55, नाशिक शहरातील 9 आणि जिल्ह्याच्या 4 तालुक्यांमधील 8 जणांचा समावेश आहे. नाशिकमध्ये अद्यापही मालेगावच कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून कायम आहे. नाशिक शहर जिल्ह्यातला दुसरा हॉटस्पॉट ठरला आहे. नाशिक शहरात आतापर्यंत 213 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. शहरातील या रुग्णांमध्ये ग्रामीणच्या 74 जणांचा समावेश आहे. कोरोनावर नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाने 34 भागांना प्रतिबंधित क्षेत्र घोषित केलं आहे. शहरातील वडाळा गावाचा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. वडाळा गावात 20 कोरोना पॉझिटिव्ह नागरिकांची नोंद झाली आहे.

जिल्ह्यातील नाशिक, चांदवड, सिन्नर, दिंडोरी, निफाड, देवळा, नांदगाव, येवला, बागलाण, इगतपुरी यासह मालेगाव या 11 तालुक्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. मालेगावमध्ये 4 दिवसांपूर्वी कोरोनावर मात केलेल्या पोलीस जमादाराचा हृदय विकाराने मृत्यू झाला आहे. ते मालेगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. कर्तव्य बजावत असताना त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. शेख यांच्या मृत्यूने पोलीस दलासह शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या :

नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या 571 वर, गड्डीगोदाम, नाईक तलाव नवे हॉटस्पॉट!

वर्ध्यातील 21 वर्षीय कोरोनामुक्त तरुणीचा मेंदूज्वराने मृत्यू

कुटुंब नाकारतं…पुण्यातील कोरोनोबळींवर करतात ‘ते’ अंत्यसंस्कार!

Corona Updates of Nashik Malegaon

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *