महाराष्ट्रात 2,287 नवीन कोरोना रुग्णांची वाढ, एकूण आकडा 72,300 वर

राज्यात आज (2 जून) कोरोनाच्या नवीन 2287 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 72 हजार 300 वर गेला आहे (Total Corona patient in Maharashtra).

महाराष्ट्रात 2,287 नवीन कोरोना रुग्णांची वाढ, एकूण आकडा 72,300 वर

मुंबई : राज्यात आज (2 जून) कोरोनाच्या नवीन 2287 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 72 हजार 300 वर गेला आहे (Total Corona patient in Maharashtra ). यापैकी आतापर्यंत राज्यभरात 31 हजार 333 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 38 हजार 493 रुग्ण कोरोना सक्रिय असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

महाराष्ट्रात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 4 लाख 83 हजार 875 नमुन्यांपैकी 72 हजार 300 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 5 लाख 70 हजार 453 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये 72 हजार 538 खाटा उपलब्ध आहेत. सध्या 35 हजार 97 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज 103 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. परिमंडळ निहाय या मृत्यूंमध्ये ठाणे – 74 (मुंबई 49, ठाणे 1, नवी मुंबई 4, पनवेल 4, रायगड 6, मीरा भाईंदर – 10), नाशिक – 2 (नाशिक 1, अहमदनगर 1), पुणे – 21 (पुणे 10, सोलापूर 5, सातारा 6), कोल्हापूर – 3 (सांगली 3), अकोला-3 (अकोला 3) यांचा समावेश आहे.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 68 पुरुष तर 35 महिला आहेत. आज नोंद झालेल्या 103 मृत्यूंपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 59 रुग्ण आहेत, तर 39 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 5 जण 40 वर्षांखालील आहे. या 103 रुग्णांपैकी 69 जणांमध्ये (67 %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड 19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 2465 झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूंपैकी 38 मृत्यू हे मागील 2 दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे 1 मे ते 30 मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील 65 मृत्यूंपैकी मुंबई 29, मीरा भाईंदर – 9, सातारा -6, सोलापूर – 4, नवी मुंबई – 3, रायगड – 3, सांगली 3, पनवेल – 2, अकोला – 3, ठाणे – 1, नाशिक -1 आणि अहमदनगर – 1 असे आहेत.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट 3730 झोन क्रियाशील आहेत. आज एकूण 19 हजार 19 सर्वेक्षण पथकांनी काम केले. त्यांनी 71.61 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केले.

कोरोनाची अद्ययावत आकडेवारी :

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई96474678305467
पुणे (शहर+ग्रामीण)44202174921200
ठाणे (शहर+ग्रामीण)67360308201818
पालघर 104625338208
रायगड96044238172
रत्नागिरी97163733
सिंधुदुर्ग2622235
सातारा1984108670
सांगली67039421
नाशिक (शहर +ग्रामीण)79324575367
अहमदनगर (शहर+ग्रामीण)102957026
धुळे168894981
जळगाव 65763768375
नंदूरबार 30917211
सोलापूर47072273367
कोल्हापूर 138584025
औरंगाबाद88214643350
जालना108961250
हिंगोली 3682912
परभणी2421327
लातूर 79836441
उस्मानाबाद 42927217
बीड2481245
नांदेड 69125628
अकोला 1906155295
अमरावती 98965938
यवतमाळ 47631514
बुलडाणा 43421617
वाशिम 2831125
नागपूर2252140423
वर्धा 44141
भंडारा175952
गोंदिया 2201633
चंद्रपूर1921060
गडचिरोली153781
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)215031
एकूण27564015261310928

संबंधित बातम्या :

कोरोनाची लस विकसित करण्यासाठी 30 माकडांवर प्रयोग, वनमंत्र्यांकडून माकडं उपलब्ध करुन देण्याचे निर्देश

औरंगाबादमध्ये अनलॉक 1 ची अंमलबजावणी, कोरोना संसर्गाची स्थिती काय?

नाशिकमध्ये 24 तासात 43 कोरोना रुग्ण, कोरोनामुक्त झालेल्या पोलीस जमादाराचा 4 दिवसात ह्रदय विकाराने मृत्यू

नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या 571 वर, गड्डीगोदाम, नाईक तलाव नवे हॉटस्पॉट!

राज्यात कोरोनामुक्त पोलिसांच्या संख्येत वाढ, दिवसभरात 35 पोलिसांना डिस्चार्ज

Total Corona patient in Maharashtra

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *