AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात कोरोना रुग्णवाढीचा भडका, तब्बल 8807 नवे रुग्ण, पिंपरीत लस घेतलेल्या तिघांना कोरोना

राज्यात आज दिवसभरात तब्बल 8807 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. (maharashtra corona update daily report)

राज्यात कोरोना रुग्णवाढीचा भडका, तब्बल 8807 नवे रुग्ण, पिंपरीत लस घेतलेल्या तिघांना कोरोना
corona virus news
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Feb 25, 2021 | 12:16 PM
Share

मुंबई : कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा रात्रंदिवस मेहनत घेत असल्या तरी, कोरोना रुग्ण कमी होताना दिसत नाहीयेत. राज्यात आज (maharashtra corona update) दिवसभरात तब्बल 8807 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. मंगळवारी हा आकडा 6218 एवढा होता. म्हणजेच कालच्या तुलनेत आज तब्बल 2500 कोरोना रुग्ण जास्त आढळले आहेत. रुग्णवाढीच्या या चढत्या आलेखामुळे सर्वजण धास्तावले असून ही रुग्णवाढ चिंताजनक असल्याचे म्हटले जात आहे. (maharashtra corona update corona patient daily report)

राज्यात कोरोना रुग्णांची वाढ झपाट्याने होत आहे. रोज हजारोंच्या संख्येने नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. आज दिवसभरात कोरोनाचे 8807 नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच आज दिवसभरात एकूण 80 बाधितांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. सध्या राज्यात कोरोनाग्रस्तांचा मृत्यूदर 2.45 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण पुणे जिल्ह्यात असून अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 10427 एवढी आहे. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कालच्या तुलनेत 94.70 टक्क्यांवर आले आहे. कालच्या तुलनेत हे प्रमाण 0.26 टक्क्यांनी कमी झाले आहे.

या शहरांची चिंता वाढली ?

राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. मात्र पुणे, अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद, ठाणे या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढतोय. मुंबईमध्ये सध्या 6900 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. तर ठाण्यात सक्रिय रुग्णांची संख्या 6552 वर पोहोचली आहे. पुण्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक असून हा आकडा 10427 वर पोहोचला आहे. नाशिक, जळगावमध्ये सक्रिय कोरोनाग्रस्तांची संख्या अनुक्रमे 1765 आणि 1749 एवढी आहे. अमरावती, नागपूर या जिल्ह्यांमध्येसुद्धा कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचं दिसत आहे. अमरावतीमध्ये कोरोनाचे 6178 सक्रिय रुग्ण आढळले आहेत.

पिंपरीत लस घेतलेल्या तिघांना कोरोना

कोरोनाल थोपवण्यासाठी सध्या देशपातळीवर लसीकरणाचा कार्यक्रम राबवला जातोय. मात्र, लस घेतली असूनसुद्धा काही जणांना कोरोनाची लागण होत असल्याचे समोर आलेय. पिंपरी चिंचवडमध्ये लस घेतलेल्या तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये महापालिका आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश आहे. पालिका प्रशासनाने प्रसिद्धीपत्रक काढून याबाबत माहिती दिलीये.

पुण्यात खासगी रुग्णालयातील 50 टक्के बेड राखीव

राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय कोरोनाग्रस्त आहेत. त्यामुळे पुणे महापालिका खबरदारी म्हणून कठोर निर्णय घेत आहे. पुणे महापालिकेनं खासगी रुग्णालयांना बेडसंदर्भात सूचना देताना शहरातील 50 टक्के बेड राखीव ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत. खाजगी रुग्णालय प्रमुखांशी झालेल्या बैठकीत पालिका आयुक्तांनी शहारातील रुग्णालयांना अश्या प्रकारच्या सूचना दिल्या आहेत.

खासगी रुग्णालयातील बेडची माहिती डँशबोर्डवर अपडेट करणं बंधनकारक करण्यात आली आहे. तसंच कोरोना रुग्णाला खाजगी रूग्णालयानं प्रवेश नाकारल्यास महापालिका करणार कारवाई आहे. त्यामुळे कोणत्याही कोरोना रुग्णाला नाकारण्याचं धाडस खासगी रुग्णालयांनी करु नये, अशी तंबीच पालिका आयुक्तांनी दिली आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनाच्या रुग्णांत रोज वाढ होताना दिसते आहे. कालच्या तुलनेत आज 2500 जास्त कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सध्या राज्यातील निर्बंध आणखी कडक केले जातात की काय?, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. तसेच लस घेतली असली तरी पुन्हा कोरोनाचा संसर्ग होत असल्यामुळे लसीच्या परिणामकारकतेवरसुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

इतर बातम्या :

मुंबईतील जम्बो कोव्हिड सेंटर पुन्हा सज्ज होणार, प्रत्येक वॉर्डमध्ये कोव्हिड सेंटरचीही उभारणी

पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली, प्रशासनाकडे पुरेसे बेड्स उपलब्ध आहेत का? वाचा सविस्तर रिपोर्ट

कर्नाटकातून सोलापूरमध्ये येणाऱ्यांसाठी कोरोना टेस्ट अनिवार्य, 7 मार्च पर्यंत रात्रीची संचारबंदी : दत्तात्रय भरणे

(maharashtra corona update corona patient daily report)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?.

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?