महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्ट्या रद्द, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय
राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर महसूल विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. सर्व कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्याचं जाहीर करण्याच आलं आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबद्दलचा निर्णय जाहीर केलाय.

राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. यावर्षी केवळ दोन महिनेच पाऊस झाला. त्यानंतरचे दोन महिने पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी पिकं पेरलेली होती. पण पाऊस न आल्याने ती पिकं उद्धवस्त झाली. पेरणीत पैसा वाया गेला. त्या पार्श्वभमिवर शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता या निर्णयानंतर राज्याच्या महसूल विभागानेही मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता सुट्ट्या मिळणार नसल्याचा हा मोठा निर्णय असून, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे.
शेतकऱ्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्याचं जाहीर करण्याच आलं आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबद्दलचा निर्णय जाहीर केलाय. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज चंद्रशेखर बावनकुळे हे राज्यामध्ये दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करत आहेत. आज ते अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भेटी घेत आहेत. या दौऱ्यामध्ये शेतकरी बांधवांशी चर्चा केली. यावेळी दुष्काळाची पाहणी केली. यावेळी अकोला येथे विविध विषयांवरील मागण्यांची निवेदने घेऊन आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. सर्वांच्या मागण्या समजून घेऊन त्याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
दरम्यान, राज्यामध्ये एकूण ३५८ तालुक्यांपैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्त्वाखालील राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय २६ सप्टेंबर २०२६ रोजी जाहीर केला आहे. राज्यातले ७५ टक्के तालुके दुष्काळाच्या कचाट्यात सापडले आहेत.
पावसाची स्थिती गंभीर बनल्याने राज्य सरकारने संबंधित तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती घोषित केली आहे. पावसाच्या दडीनंतर शेतीवर झालेल्या परिणामांचा विचार करुन निकष ठरवण्यात आलेले आहेत. त्यानंतर ट्रिगर १ लागू झालेल्या २६ ५ तालुक्यांमध्ये हा दुष्काळ जाहीर झाला.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलं आहे की, दुष्काळाचा फटका बसलेल्या इतर तालुक्यांनाचा अभ्यास करून त्यांनाही ट्रिगर१ मध्ये समाविष्ट करण्यात येईल आणि त्यांनाही दुष्काळग्रस्त तालुके म्हणून घोषित करण्यात येईल.