Javed Akhtar on Ramayana: धर्म कोणताही असो, प्रत्येक भारतीयाच्या रक्तात… ‘रामायण’ सिनेमावर जावेद अख्तर यांचे मोठं वक्तव्य
Javed Akhtar on Ramayana: अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री साई पल्लवी स्टारर 'रामायण' सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर, चाहत्यांच्या मनात राज्य करताना दिसत आहेत. पण आता सिनेमावर संगीतकार जावेद अख्तर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

Javed Akhtar on Ramayana: सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘रामायण’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. बॉक्स ऑफिसवर देखील सिनेमा बक्कळ कमाई करत आहे. आज सलग 13 व्या दिवशी ‘रामायण’ सिनेमाची बॉक्स ऑफिसवर असलेली पकड मजबूत असल्याचं दिसत आहे. फक्त प्रेक्षकांनीच नाही तर, सिनेमा विश्लेषकांनी देखील सिनेमाचं कौतुक केलं आहे. आता प्रसिद्ध आणि लोकप्रिय संगीतकार जावेद अख्तर यांनी देखील ‘रामायण’ सिनेमाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सांगायचं झालं तर, जावेद अख्तर यांनी अद्याप सिनेमा पाहिलेला नाही. पण सिनेमा पाहण्याची त्यांची इच्छा आहे. जावेद यांनी भगवान रामाबद्दल स्वतःचे विचार मांडले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, भगवान राम केवळ एक व्यक्ती नाहीत, तर एक आदर्श आणि जगण्याची एक पद्धत आहेत.
‘रामायण’ सिनेमाबद्दल काय म्हणाले जावेद अख्तर?
मंगळवारी पार पडलेल्या एका कार्यक्रमात जावेद अख्तर यांनी ‘रामायण’ सिनेमाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. जावेद अख्तर यांनी विचारण्यात आलं की, ‘नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ सिनेमा पाहिला का?’ यावर जावेद अख्तर म्हणाले, ‘मी हा सिनेमा नक्कीच पाहाणार आहे. माझी मुलगी झोया हिने सिनेमा पाहिला आहे आणि तिने सिनेमाचं कौतुक देखील केलं. ती सहसा कोणत्या गोष्टीचं कौतुक करत नाही…’
पुढे जावेद अख्तर म्हणाले, ‘भगवान राम केवळ एक व्यक्ती नाहीत, तर एक आदर्श आणि जगण्याची एक पद्धत आहेत. राम हे नैतिकतेचं एक प्रतीक आहेत. प्रत्येक भारतीयामध्ये आणि त्यांच्या संस्कारामध्ये राम आहे आणि हे चित्र जेव्हा तुम्ही पाहाता, तेव्हा त्याचं कौतुक करता. ही गोष्ट थेट हृदयाला स्पर्ष करते. कदाचित माझ्या वक्तव्यामुळे उद्या अनेक जण नाराज देखील होतील, प राम यांचे विचार प्रत्येक भारतीयाच्या रक्तात भिनलेले आहेत.’ मग की व्यक्ती कोणत्याही धर्माची असेल… जरी त्यांच्याकडे कधीकधी एक व्यक्ती म्हणून पाहिलं जात असले, तरी त्यांचं महत्त्व त्यापेक्षा कितीतरी अधिक आहे. ते जीवन जगण्याच्या एका तत्त्वज्ञानाचं प्रतिनिधित्व करतात.’ असं देखील जावेद अख्तर म्हणाले.
सोनिया गांधी यांच्या पुस्तकावर जावेद अख्तर यांची प्रतिक्रिया…
सोनिया गांधी यांचं पुस्तक ‘Belonging: A Journey of Love’ वाचण्यास जावेद अख्तर यांनी सुरुवात केली आहे. त्यांना हे पुस्तक फार आवडलं आहे. कार्यक्रमात अख्तर म्हणाले, ‘सोनिया गांधी यांचं पु्स्तक फार चांगलं आहे. हे पुस्तक लिहिण्याचा अंदाज प्रचंड सुंदर आणि सरळ आहे. पुस्तक वाचायला देखील आनंद येत आहे. पूर्ण पुस्तक वाचून झाल्यानंतर मी याबद्दल बोलेल. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, माझ्या मनात सोनिया गांधी यांच्याबद्दल प्रचंड सन्मान आहे. मी काँग्रेसचा नसली तरी, सोनिया गांधी यांचा आदर करतो…’ असं देखील जावेद अख्तर म्हणाले.
