AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुष्काळ जाहिर केला पण मदत कधी मिळणार? युवा शेतकऱ्याचा थेट सवाल

जनावरांसाठी दररोज मला चारा, पाणी, खूराकासाठी पंधरा हजार खर्च येतो. दुध होतय नऊ हजाराचे मग आम्ही आता कसे जनावरे संभाळायचे असा सवाल युवक शेतकऱ्याने सरकारला केला आहे.

दुष्काळ जाहिर केला पण मदत कधी मिळणार? युवा शेतकऱ्याचा थेट सवाल
DraughtImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 11, 2026 | 8:40 AM
Share

राज्यात यंदा एलनिनोमुळे पाऊसच झाला नाही, सुरुवातीला दीड महिना जूनचा अर्धा महिना आणि जुलैचा संपूर्ण एक महिना राज्यात चांगला पाऊस पडला, मात्र त्यानंतर पावसात जो खंड पडला त्यानंतर पाऊसच झाला नाही. संपूर्ण ऑगस्ट आणि सप्टेंबर महिना कोरडा गेल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. खरीप हंगाम हातचा गेला, पाऊस नसल्यामुळे आता रब्बी हंगाम देखील संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. राज्यात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. आता एका युवक शेतकऱ्याने सरकारला पत्र लिहिले आहे.

आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रूक येथील युवक शेतकरी सोहल शेखने नोकरीच्या मागे न लागता आपल्या आई वडिलांसमवेत दुधाचा धंदा निवडला. आज या सोहल शेख यांच्याकडे तब्बल 50 गायी आहेत. या भयान दुष्काळाने शेतकरी तर मेटाकूटीला आलाय. पण यात जनावरे जगवणे खूप अवघड होऊन बसले आहे. जनावरांसाठी साठवून ठेवलेला संपुर्ण चारा संपला असून मुरघासाचे खड्डे कोरडे ठक्क‌ पडले आहेत. दोन दिवस पुरेल ऐवढाच चारा शिल्लक असल्याने शेतकरी मोठा हताश झाला आहे.

दररोज चारा, पाणी, खूराकासाठी पंधरा हजार रुपये पूरत नाहीत. जनावरांना पिण्यासाठीच पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने जनावरे धूणे तर लांबच राहिले… जनावरांना धूऊन न काढल्याने त्यांना उष्णतेमुळे अजून दुध कमी होत आहे. चारा पाण्यासाठी पंधरा हजार रुपये दररोजचा खर्च आणि दुधाचे उत्पादन फक्त नऊ हजार. आज आम्हाला कोणतीच बॅक कर्ज देण्यासाठी तयार नाही. मग कसे जनावरे जगवायचे हा मोठा प्रश्न आमच्या पुढे आहे….

हे गणित जुळता जुळेना असच राहिल तर आम्हाला टोकाचे पाऊल उचलावे लागेल. सरकार म्हणतं नौकरी ऐवजी काम धंदयाला लागा मग आता आम्ही कसं करायच तुम्हीच सांगा साहेब असे भावनिक उदगार युवक शेतकरी सोहल शेख यांनी व्यक्त केले आहेत.

दुष्काळ जाहीर होऊन दहा दिवस झाले तरी अद्याप ना कसले अनुदान ना चारा ना छावणी कसे संभाळायचे जनावरे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. माय बाप सरकार लवकरात लवकर आम्हाला मदत दया तरच आम्ही जगवू शकतो अशी आर्त हाक शेतकरी सरकारकडे करत आहे.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे