AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Drought Situation : विदर्भात भीषण दुष्काळाची स्थिती, Exclusive रिपोर्ट ‘टीव्ही ९ मराठी’च्या हाती

Maharashtra Drought Situation : सप्टेंबर महिना आला तरी अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. शेतकऱ्यासमोर मोठ संकट उभं आहे. जुलै महिन्याचा अपवाद वगळता अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. विदर्भातील दुष्काळाची स्थितीचा Exclusive रिपोर्ट ‘टीव्ही ९ मराठी’च्या हाती आला आहे.

Maharashtra Drought Situation : विदर्भात भीषण दुष्काळाची स्थिती, Exclusive रिपोर्ट ‘टीव्ही ९ मराठी’च्या हाती
Drought Situation Image Credit source: PTI
| Updated on: Sep 23, 2026 | 7:22 AM
Share

गजानन उमाटे, प्रतिनिधी : पावसाने ओढ दिल्याने महाराष्ट्राची वाटचाल दुष्काळाच्या दिशेने सुरु आहे. राज्यात भीषण दुष्काळ पडेल अशी स्थिती आहे. पावसाळ्यातल्या चार महिन्यात जुलै महिना सोडला , तर अन्य तीन महिन्यात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. अशीच स्थिती राहिली तर बळीराजाला आणि राज्यातील जनतेला मोठ्या संकटाच्या परिस्थितीला सामोर जावं लागेल. शेतकऱ्याचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. पण पावसाचे ढग दूरदूरपर्यंत दिसत नाहीयत. मराठवाडा आणि विदर्भ या दोन भागात परिस्थिती जास्त गंभीर आहे. 1972 सारखा किंवा त्यापेक्षाही भयंकर दुष्काळ पडणार अशा चर्चा आतापासूनच सुरु झाल्या आहेत. कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रातही आपण दुष्काळाबाबतची अधिसूचना तीन दिवसात काढणार आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे.

आज स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करणार आहेत. आज देवेंद्र फडणवीस लातूर जिल्ह्यातील दोन आणि सोलापूर जिल्ह्यातील तीन ठिकाणाची पाहणी करतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अमरावती, अकोला आणि बुलढाण्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणार आहेत.

नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात दुष्काळीची दाहकता, परिस्थिती किती गंभीर आहे, त्याचा Exclusive रिपोर्ट ‘टीव्ही ९ मराठी’च्या हाती आला आहे

नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील दुष्काळाचा अहवाल

नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात ३३६ महसूली मंडळांपैकी १८ मंडळात सरासरी ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस

तर २१ दिवसांचा पावसाचा खंड या निकषानुसार १५० पेक्षा जास्त मंडळात दुष्काळी स्थिती

( नागपूर जिल्हा )

महसूल आणि कृषी विभागाच्या अहवालानुसार नागपूर जिल्ह्यात पिकांचं मोठं नुकसान, दुष्काळ जाहिर करण्याची शिफारस

नागपूर जिल्ह्यात २५ हजार ७८७ हेक्टरील संत्रा आणि मोसंबी बागांचे नुकसान

दुष्काळी स्थिती आणि फळगळमुळे नागपूर जिल्ह्यातील ३२ हजार ५८९ शेतकऱ्यांचे नुकसान

ॲागस्ट महिन्यात पावसाचा दोन आठवड्यांपेक्षा मोठा खंड पडल्याने नागपूर जिल्हा दुष्काळ जाहिर करण्याचा निकष पूर्ण करतो

नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत ५३६ मीमी म्हणजेच सरासरीच्या फक्त ६५ टक्केच पावसाची नोंद

दुष्काळी स्थितीमुळे जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, फळबागा, भाजीपाला, धान पिकाचंही मोठं नुकसान

( चंद्रपूर जिल्हा दुष्काळ अहवाल )

चंद्रपूर जिल्ह्यात चार महसूली मंडळात केवळ २५ ते ५० टक्केच पाऊस

तर ४८ महसूली मंडळात ५० ते ७५ टक्के पावसाची नोंद

चंद्रपूर जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ६५ टक्केच पाऊस झाल्याने धान, सोयाबीन, कापूस, तूर पिकाचं मोठं नुकसान

दुष्काळी स्थितीमुळे खरीप पिकांच्या उत्पादनात १५ ते २० टक्के घट होण्याची अहवालात नोंद

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील १२६ गावातील १० हजार ७९५ शेतकऱ्यांचे १२ लाख ७३५.६१ हेक्टर पिकांचं नुकसान

वर्धा जिल्ह्यातील अहवाल

वर्धा जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ३४ टक्के पावसाची तूट

जिल्ह्यातील ४० मंडळात सरासरीच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस

५५ मंडळापैकी बहुसंख्य मंडळात कमी पावसाची नोंद

जिल्ह्यातील नऊ महसूल मंडळात २१ दिवसांचा पावसाचा खंड

तर सहा मंडळात १८ ते २० दिवसांचा पावसाचा खंड

सोयाबीन, कापूस उत्पादनात घट होणार

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?