AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra HSC board Exam Date 2027 : इयत्ता 12 वीच्या परीक्षेची तारीख जाहीर, या दिवशी पहिला पेपर; विद्यार्थ्यांनो तयारीला लागा!

Maharashtra HSC board Exam Date 2026-27 Time Table in Marathi: शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीच्या परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांनी ही तारीख लक्षात घेऊनच अभ्यासाचे नियोजन करावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Maharashtra HSC board Exam Date 2027 : इयत्ता 12 वीच्या परीक्षेची तारीख जाहीर, या दिवशी पहिला पेपर; विद्यार्थ्यांनो तयारीला लागा!
hsc board exam dateImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 17, 2026 | 9:01 PM
Share

HSC Board Exam 2027 Date : इयत्ता बारावीचे वर्ष हे खूपच महत्त्वाचे असते. या इयत्तेत चांगले गुण मिळाले तर भविष्यात पदवीसाठी चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळू शकतो. सोबतच इयत्ता बारावीच्या परीक्षेनंतरच करिअरची खरी वाट खुली होते. त्यामुळेच हे वर्ष विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप महत्त्वाचे मानले जाते. महाराष्ट्रात दरवर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षेसाठी तयारी करत असतात. यंदादेखील अनेक विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत आहेत. ही परीक्षा नेमकी कधी होणार, याची विद्यार्थी, पालक विचारणा करत होते. असे असतानाच आता राज्य शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीच्या परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. ही परीक्षा कधीपासून कधीपर्यंत होईल, याची माहिती समोर आली आहे.

इयत्ता बारावीची परीक्षा नेमकी कधीपासून सुरू होणार?

शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीच्या परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांनी ही तारीख लक्षात घेऊनच अभ्यासाचे नियोजन करावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. बारावीची लेखी परीक्षा 8 फेब्रुवारी रोजीपासून सुरू होईल. त्यानंतर ही परीक्षा 16 मार्चपर्यंत असेल. दरम्यान, कोणता पेपर नेमका कधी असेल याचे सविस्तर वेळापत्रक समोर आलेले नाही. परंतु परीक्षा मंडळाने पेपर सुरु होण्याची तारीख जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांना आता आपल्या अभ्यासाचे नियोजन करता येणार आहे. विद्यार्थ्यांकडे सध्या एकूण पाच महिने आहेत. त्यामुळे परीक्षेची तारीख लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना आपला अभ्यास करावा लागणार आहे.

विद्यार्थ्यांनी नेमकं काय करावं? अभ्यासाचं नियोजन कसं करावं?

दरम्यान, एकदा परीक्षेची तारीख जाहीर झाली की विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासाचे नियोजन करणे सोपे होते. परंतु परीक्षेची तारीख समोर आली की काही विद्यार्थ्यांना त्याचे दडपन वाटायला लागते. अशा स्थितीत जास्त विचार न करता आपला अभ्यास चालू ठेवावा. अभ्यासक्रम पूर्ण झालेला नसेल तर शिकवून झालेल्या धड्यांचा अभ्यास करावा. तसेच खेळ, झोप यांची सांगड घालून अभ्यास करावा. कोणताही तणाव न घेता अभ्यास केला तर यशाची हमी हमखास देता येते, असे तज्ज्ञ सांगतात.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...