AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाच विधान परिषद जागांसाठी मतदान संपन्न, 27 तारखेला निकाल, कोणत्या मतदारसंघात किती मतदान, वाचा A टू Z

महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान पूर्ण झाले असून आता 27 तारखेच्या निकालाकडे लक्ष लागले आहे. नागपूर, मराठवाडा, अमरावती आणि पुण्यातील मतदानाच्या आकडेवारीत मोठी तफावत दिसतेय; कोणत्या मतदारसंघात किती मतदान झाले?

पाच विधान परिषद जागांसाठी मतदान संपन्न, 27 तारखेला निकाल, कोणत्या मतदारसंघात किती मतदान, वाचा A टू Z
maharashtra mlc election percentageImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 23, 2026 | 11:09 PM
Share

महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीने आपली ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आता 27 तारखेला मतमोजणी होणार असून, त्यानंतर कोणत्या पक्षाला किती यश मिळाले, हे स्पष्ट होईल. दरम्यान, विविध मतदारसंघांमध्ये मतदानाची टक्केवारी वेगवेगळी राहिली आहे. नागपूर आणि मराठवाडा पदवीधर मतदारसंघासह अमरावती शिक्षक, तसेच पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात किती मतदान झाले, याची सविस्तर आकडेवारी जाणून घेऊया.

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात 60.69 टक्के मतदान

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सायंकाळी 4 वाजेपर्यंतच्या अंदाजित आकडेवारीनुसार एकूण 60.69 टक्के मतदान झाले. विभागातील वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक 68.86 टक्के मतदानाची नोंद झाली. तर भंडारा जिल्ह्यात सर्वात कमी 52.35 टक्के मतदान झाले.

जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी

– वर्धा : 68.86 टक्के – गडचिरोली : 68.78 टक्के – नागपूर : 60.20 टक्के – चंद्रपूर : 58.20 टक्के – गोंदिया : 62.57 टक्के – भंडारा : 52.35 टक्के

नागपूर विभागातील एकूण मतदानाची टक्केवारी 60.69 टक्के इतकी आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात 59.62 टक्के मतदान

मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी सरासरी 59.62 टक्के मतदान झाले. विभागातील धाराशिव आणि परभणी जिल्ह्यांत तुलनेने अधिक मतदान झाले, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 55.73 टक्के मतदानाची नोंद झाली.

जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी

– छत्रपती संभाजीनगर : 55.73 टक्के – नांदेड : 59.81 टक्के – हिंगोली : 61.58 टक्के – बीड : 59.67 टक्के – परभणी : 61.81 टक्के – धाराशिव : 62.53 टक्के – लातूर : 56 टक्के – जालना : 59.81 टक्के

धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक 62.53 टक्के, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 55.73 टक्के मतदान झाले.

नांदेडमध्ये 59.81 टक्के मतदान; महिलांचा सहभाग किती?

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नांदेड जिल्ह्यात सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत 59.81 टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील 120 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. जिल्ह्यातील एकूण 36,687 मतदारांपैकी 21,942 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुष मतदारांची मतदानाची टक्केवारी 63.36 टक्के, तर महिला मतदारांची टक्केवारी 47.07 टक्के होती.

अमरावती शिक्षक मतदारसंघात 91.08 टक्के मतदान

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात मतदानाचा टक्का लक्षणीय राहिला. दुपारी 4 वाजेपर्यंतच्या अंदाजित आकडेवारीनुसार विभागात एकूण 91.08 टक्के मतदान झाले. वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक 92.87 टक्के, तर अमरावती जिल्ह्यात 89.36 टक्के मतदानाची नोंद झाली.

जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी

– अमरावती : 89.36 टक्के – अकोला : 92.12 टक्के – यवतमाळ : 92.17 टक्के – बुलढाणा : 90.75 टक्के – वाशिम : 92.87 टक्के

अमरावती विभागातील एकूण मतदान 91.08 टक्के झाले. शिक्षक मतदारसंघातील या मतदानाच्या आकडेवारीकडेही राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात किती मतदान?

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठीही मतदान पार पडले.  पुणे पदवीधर मतदारसंघात 62 टक्क्यांपेक्षा अधिक, तर शिक्षक मतदारसंघात 82 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले. या दोन्ही मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार ताकद लावली होती. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल दोन्ही बाजूंसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. मतदारांनी कोणाच्या बाजूने कौल दिला आहे, हे 27 तारखेला मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.

27 तारखेला निकालाकडे लक्ष

विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. नागपूर आणि मराठवाडा पदवीधर मतदारसंघांतील मतदानाची टक्केवारी 60 टक्क्यांच्या आसपास राहिली, तर अमरावती शिक्षक मतदारसंघात 91 टक्क्यांहून अधिक मतदान झाले. पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतही मतदानाचा टक्का वेगवेगळा राहिला.

महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत मतदारांचा कौल कोणाला मिळतो, हे 27 तारखेला स्पष्ट होईल.

Follow Us
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
Maharashtra MLC Election 2026 Voting : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
Kolhapur : ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं कृत्य उघड, चुलत्यालाच दिला मोठा धक्का
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
Jio Platforms IPO : ऐतिहासिक विक्रम! जिओ प्लॅटफोर्मच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
Manoj Jarange Patil : शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; मनोज जरांगे पाटील रामदास कदमांवर भडकले, नेमकं काय म्हणाले?
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड
Prasad Kadam : रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाडांचं सडेतोड उत्तर
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
Ramdas Kadam : समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगे पाटलांवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
CM Devendra Fadnavis : अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट...
बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी..
Pune : बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…