Maharashtra News Live : शिवसेनेच्या वॉर रूम मधील संभाषण बाहेर आलं तर बरच काही बाहेर येईल
Maharashtra News Live : नंदुरबार जिल्ह्यातील दुष्काळी पैसेवारीवरून आमदार चंद्रकांत रघुवंशी आक्रमक. अधिकाऱ्यांना पापी म्हणत प्रशासनाला दिली तंबी. पैसेवारी आणि आणेवारी निश्चित करताना कोणत्याही विभागाने अडथळा आणू नये. पैसेवारीत पैसे खाणारे पाप करणारे लोक आहेत असं ते म्हणाले.

LIVE NEWS & UPDATES
-
पुण्यातील उच्चभ्रू शाळेत नववीच्या विद्यार्थ्याचा अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला
पुण्यातील म्हाळुंगे-बालेवाडी परिसरातील नामांकित शाळेत नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला व्हिडीओ डिलीट करण्यास सांगितल्याच्या वादातून हा हल्ला झाल्याची माहिती आहे.
-
नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे दोन गटात हाणामारी
नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे परवा रात्री दोन गटात हाणामारी झाली. पोलिसांसमोर झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय. राजकीय वादातून परवा रात्री दुर्गा देवी विसर्जनावेळी दोन गटात हाणामारी झाली होती. नंतर दोन्ही गटात समन्वयाने वाद मिटविण्यात आला होता. त्यामुळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. काल रात्री पुन्हा हे दोन गट आप आपसात भिडले. दोन गटात काल रात्री झालेल्या हाणामारीत दोन जण जखमी झाले आहेत. एका गटातील भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे जखमी झाले आहेत. तर दुसऱ्या गटातील लहू मेटकर नामक तरुण जखमी आहे. या दोघांवर उपचार सुरू आहेत.
-
-
शिवसेनेच्या वॉर रूम मधील संभाषण बाहेर आलं तर बरच काही बाहेर येईल – मनसे
शिवसेनेच्या वॉर रूम मधील संभाषण बाहेर आलं तर बरच काही बाहेर येईल. लोकशाहीला सुरुंग लावण्याचं ही षडयंत्र. दोन पक्षाच्या भांडणामध्ये इंटरेस्ट नाही. वृत्त समूहाला लालूच देऊन षडयंत्र रचलं जात का. महायुतीमध्ये बेबनाव आहे की नाही यात आम्हाला इंटरेस्ट नाही मात्र विरोधी पक्ष नेता संपवण्यासाठी हे करत आहेत का षडयंत्र संदीप देशपांडेंचा सवाल
पुणे पदवीधरसाठी 62.78 टक्के, शिक्षकसाठी 85.87 टक्के मतदान झालं. गत निवडणुकीपेक्षा टक्केवारीत वाढीमुळे निकालाची उत्कंठा. सन 2020 च्या निवडणुकीच्या तुलनेत शिक्षक मतदारसंघात 12.83 टक्के, तर पदवीधर मतदारसंघात 4.82 टक्क्यांनी मतदान वाढले. विधानपरिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदारंसघात शुक्रवारी 62.78 टक्के मतदान आणि शिक्षक मतदारसंघात उच्चांकी 85.87 टक्के मतदान झाले. पदवीधर मतदारसंघात तीन लाख 88 हजार 19 मतदारांपैकी दोन लाख 43 हजार 611 जणांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी 62.78 झाली. सन 2020 मध्ये चार लाख 26 हजार 257 मतदारांपैकी दोन लाख 47 हजार 917 जणांनी मतदान केले होते. त्या वेळी 57.96 टक्के मतदान झाले होते.
Published On - Oct 24,2026 10:05 AM
