AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा 1 हजार पार, 24 तासात 221 पोलीस पॉझिटिव्ह

महाराष्ट्र पोलीस दलाला कोरोनाने विळखा घातला असून गेल्या 24 तासात (Maharashtra Police Corona Virus Cases) तब्बल 221 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा 1 हजार पार, 24 तासात  221 पोलीस पॉझिटिव्ह
| Updated on: May 11, 2020 | 11:23 AM
Share

मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलाला कोरोनाने विळखा घातला आहे. गेल्या 24 तासात तब्बल 221 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा 1 हजारच्या वर पोहोचला आहे. (Maharashtra Police Corona Virus Cases)

महाराष्ट्र पोलीस विभागातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या काही दिवसात पोलिसांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून आज (11 मे) सर्वाधिक 221 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा 786 वरुन 1 हजार 007 वर पोहोचला आहे.

पोलिसांना कोरोनाचा विळखा

  • सोमवार 11 मे – 221
  • रविवार 10 मे – 72
  • शनिवार 9 मे – 96
  • शुक्रवार 8 मे – 87
  • गुरुवार 7 मे – 36
  • बुधवार 6 मे – 38

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नात गेल्या सहा दिवसात जवळपास 550 पोलिसांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. तर दुर्देवाने आतापर्यंत 7 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. यात मुंबईतील 3, पुणे 1, सोलापूर 1 अशा 5 पोलिसांना आपला जीव गमवावा लागला.

सुदैवाने यातील 13 अधिकारी आणि 63 पोलीस कर्मचारी असे एकूण 76 जण बरे होऊन घरी परतले आहेत.

दरम्यान जर पोलिसांना कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. 

(Maharashtra Police Corona Virus Cases)

संबंधित बातम्या : 

महाराष्ट्र पोलीस दलाला कोरोनाचा विळखा, पाच दिवसात 329 पोलिसांना संसर्ग

पुणे विभागातील 1 हजार 23 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!