Monsoon Alert : राज्यात पुढचे 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, IMD कडून रेड, ऑरेंज आणि यलो ॲलर्ट जारी

भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेनं राज्यासाठीचा पुढील 5 दिवसांचा हवामानाचा अंदाज जारी केला आहे. हवामान विभागानं पुढील पाच दिवसांसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांना रेड , ऑरेंज आणि यलो अ‌ॅलर्ट जारी केला आहे.

Monsoon Alert : राज्यात पुढचे 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, IMD कडून रेड, ऑरेंज आणि यलो ॲलर्ट जारी
Rain Update
| Edited By: | Updated on: Jul 21, 2021 | 3:04 PM

मुंबई: भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेनं राज्यासाठीचा पुढील 5 दिवसांचा हवामानाचा अंदाज जारी केला आहे. हवामान विभागानं पुढील पाच दिवसांसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांना रेड , ऑरेंज आणि यलो अ‌ॅलर्ट जारी केला आहे. आजच्या दिवसासाठी 7 जिल्ह्यांना रेड अ‌ॅलर्ट जारी केला आहे. आठ जिल्ह्यांमध्ये कोकणातील पाच आणि पश्चिम महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांचा समावेश आहे. मुंबई, पालघर, ठाणे रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्याला रेड अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाचे ज्येष्ठ अधिकारी के.एस. होसाळीकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.

22 जुलै रोजी पावसाचा अंदाज काय?

सातारा, पुणे, कोल्हापूर, रायगड आणि रत्नागिरीला रेड अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर, पालघर, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्गला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. नाशिक, परभणी, हिंगोली, नांदेड, गोंदिया आणि गडचिरोलीला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

23जुलै रोजी पावसाचा अंदाज काय?

सातारा, पुणे, कोल्हापूर, रायगड आणि रत्नागिरी,पालघर, मुंबई, ठाणे, चंद्रपूर सिंधुदुर्गला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर, यवतमाळ, वाशिम आणि वर्धा जिल्ह्याला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

24 जुलै रोजी काय स्थिती

24 जुलै रोजी राज्यातील पाऊस कमी होण्याचा अंदाज आहे. त्या दिवशी राज्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर, पालघर, मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर, अमरावती आणि अकोला जिल्ह्याला यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.

25 जुलैसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला केवळ ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर, रायगड, ठाणे, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

राज्यात ठिकठिकाणी पावसाची बँटिंग

बुलडाणा जिल्ह्यात अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस सुरुय, मात्र, बाराच्या दरम्यान जोरदार पावसाला सुरुवात झाली.

नाशिक जिल्ह्यात बहुतांश भागात रात्रभर पाऊस झाला दिवसा मात्र पावसानं विश्रांती घेतली आहे. गंगापूर धरणात दोन दिवसात सुमारे दोनशे दशलक्ष घनफुट वाढला साठा आहे. आजचा एकूण साठा 2094 दशलक्ष घनफुट इतका आहे.

नालासोपारा सेंट्रल पार्क, नगीनदासपाडा, स्टेशन रोड पाण्याखाली गेला.वसई विरार नालासोपाऱ्यात पावसाची संततधार सुरूच आहे. अधून मधून जोरदार पाऊस पडत आहे. दुपारच्या सुमारास आभाळ काळेकुट्ट झालेले दिसले.त्यामुळे आणखी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

कराडसह सातारा जिल्ह्यात ढगाळ वातावरण अधुनमधून रिमझिम पाऊस होत आहे. सांगली जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून रिमझिम पाऊस सतत थांबून पडत आहे.

इतर बातम्या:

मुंबई कोकणात धुवाँधार मात्र मराठवाड्यात अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा, धरणक्षेत्रात पाऊसच नाही!

Mumbai Rains Live Update | मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज