AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राच्या महामार्गांवर मृत्यूचे तांडव, एकाच दिवशी 3 भीषण अपघात; दोन जीवलग मित्रांचा जागीच अंत

महाराष्ट्रात आज ३ मोठे रस्ते अपघात झाले. पुणे-सातारा हायवेवर अज्ञात वाहनाच्या धडकेत २ तरुणांचा मृत्यू झाला, परभणीत टिप्परच्या धडकेत पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला, तर मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ट्रकच्या लायनरला आग लागून अपघात झाला.

महाराष्ट्राच्या महामार्गांवर मृत्यूचे तांडव, एकाच दिवशी 3 भीषण अपघात; दोन जीवलग मित्रांचा जागीच अंत
accident
| Updated on: Jun 02, 2026 | 10:53 AM
Share

महाराष्ट्रात आज वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तीन भीषण रस्ते अपघातांनी राज्य हादरले आहे. या दुर्घटनांमध्ये पुणे-सातारा महामार्गावर 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर परभणी येथे एका अपघातात पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. तसेच मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ट्रकच्या ब्रेक लायनरला आग लागून झालेल्या अपघातात सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. या घटनेनंतर रस्ते सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

पुणे-सातारा महामार्गावर अज्ञात वाहनाची धडक, दोन मित्रांचा मृत्यू

पुणे-सातारा महामार्गावरील भोर जवळील सारोळा गावाच्या हद्दीत अपघाताची घटना घडली. या ठिकाणी दुचाकीवरून जाणाऱ्या दोन मित्रांना पाठीमागून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, धडक बसल्यानंतर नियंत्रण सुटलेली दुचाकी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या गटरमध्ये जाऊन कोसळली. या अपघातात तुषार दादासाहेब शिंदे आणि अथर्व विजय पाटील या दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. भोरच्या राजगड पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

परभणीत हायवा टिप्परने दुचाकीला उडवले; पोलीस कर्मचारी गंभीर

तर दुसरीकडे परभणी-पूर्णा महामार्गावरही भीषण रस्ते अपघात घडला. पूर्णा शहरातील ताडकळस टी पॉईंटवर एका भरधाव हायवा टिप्परने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात मोटारसायकलचा पूर्णपणे चुराडा झाला असून दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. जखमी झालेली व्यक्ती ही पोलीस कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ट्रकच्या ब्रेक लायनरला आग, मागून येणाऱ्या ट्रकची धडक

तर आज पहाटे ४:१५ वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर तिसरा अपघात घडला. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील जवळ एका ट्रकच्या ब्रेक लायनरला अचानक आग लागली. याच दरम्यान पाठीमागून येणाऱ्या एका नवीन ट्रकची या ट्रकला जोरदार धडक बसली. ही धडक इतकी तीव्र होती की, नवीन ट्रक थेट रस्त्याच्या मधील डिव्हायडरवर जाऊन आदळला.

या अपघातामुळे एक्सप्रेसवेवर काही काळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र, महामार्ग पोलीस, आयआरबी यंत्रणा आणि बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्त वाहने बाजूला केली आणि वाहतूक सुरळीत केली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही आणि मोठा अनर्थ टळला.

Follow Us
हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
Vidyanand Bapat | भावना म्हणजे हात-पाय दुखण्यासारख्या नाहीत! हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! 8 दिवस बंदी
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! भाजपच्या नगरसेवकांची 8 दिवस बंदीची मागणी; मनसेचा तीव्र विरोध
जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी...
Manoj Jarange Patil | जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी प्रमाणपत्रांवर ठाम; GR झाल्याशिवाय माघार नाहीच
फडणवीस दिल्लीत जाणार; राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर
Sanjay Raut | फडणवीस दिल्लीत जाणार; संजय राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर सूचक विधान
मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? बापटांवरील हल्ल्यावर पवारांचा संताप
Sharad Pawar | मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? विद्यानंद बापटांवरील हल्ल्यावर शरद पवारांचा संताप; हा लोकशाही आणि मूलभूत अधिकारांवर हल्ला
मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई...
CM Fadnavis | मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करणार; तिसऱ्या मुंबईचेही संकेत
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा