AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलून सेवेलाही महागाईचा फटका, आता केस कटिंग, दाढीही महागणार.. नवे दर कधीपासून लागू ?

महाराष्ट्रात सलून सेवा जून 2026 पासून 20% महागणार आहे. महाराष्ट्र नाभिक महामंडळाने वाढती महागाई, इंधन व साहित्याच्या किमतींमुळे हा दरवाढीचा निर्णय घेतला आहे. यामुळे केस कापण्यासह दाढीचे दर वाढणार असून सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसेल. ही दरवाढ व्यावसायिकांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असल्याचे महामंडळाने म्हटले आहे, तर ग्राहकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

सलून सेवेलाही महागाईचा फटका, आता केस कटिंग, दाढीही महागणार.. नवे दर कधीपासून लागू ?
सलून सेवा महागणार, आजपासून नवे दर
| Updated on: Jun 06, 2026 | 10:20 AM
Share

आधी गॅस, मग पेट्रोल- डिझेल, तर कधी सोन्याच्या दरात वाढ.. देसभरात महागाईचा भडका इडला असून दिवसेंदिवस सर्वच गोष्टींचे भाव वाढतच चालले असून सर्वसामान्यांच्या मात्र नाकीनऊ आले आहेत. त्यातच आता आणखी एक मोठी अपडेट आली आहे. सलूनमध्ये जाऊन दाढी करणं, केस कापणं हेही आता महाग होणार आहे. सलूनसेवेचे दर 20 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय महाराष्ट्र नाभिक महामंडळाने घेतला असून त्यामुळे आता ग्राहकांना सलून सेवांसाठी आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचा खिसा चांगलाच हलका होणार आहे.

सलून व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सलून सेवांच्या दरांमध्ये 20 टक्क्यांची वाढ होणार असल्याची माहिती आहे. ही दरवाढ आजपासून लागू होणार असून ग्राहकांना उद्यापासून नवीन दरानुसार पैसे भरावे लागणार आहेत. त्यामुळे केस कापण्यासाठी जर 100 रुपये दर असतील तर त्याजागी आता 120 रुपये तर दाढीसाठी 80 च्या जागी 100 रुपये मोजावे लागतील.

का होणार दरवाढ ?

युद्धामुळे झालेल्या इंधन दरवाढीचा फटका सलून व्यवसायालाही बसला आहे. सलून व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या कॉस्मेटिक वस्तू, इंधन, वीजबिल, दुकानांचे भाडे तसेच कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये झालेली वाढ यामुळे सलून चालकांवर आर्थिक ताण वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व सलून सेवांच्या दरांमध्ये 20 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढती महागाई, सलूनमध्ये वापरल्या जाणाऱ्या साहित्याच्या वाढलेल्या किंमती, वीजबिल, दुकानभाडे आणि कर्जावरील वाढते हप्ते यामुळे व्यवसाय चालवणे कठीण झाल्याचे महामंडळाने म्हटले आहे. त्यामुळे दरवाढीचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आलं.

ग्रामीण आणि शहरी भागातील नवीन दर आजपासून, म्हणजे 6 जून 2026 पासून लागू करण्यात आले आहेत. ही दरवाढ नफा वाढवण्यासाठी नसून सलून व्यावसायिक आणि त्यांच्या कुटुंबांचे आर्थिक अस्तित्व टिकवण्यासाठी आवश्यक असल्याचे महामंडळाचे राज्याध्यक्ष सयाजी झुंजार यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, ग्राहकांनीही या निर्णयाकडे केवळ दरवाढ म्हणून न पाहता हजारो नाभिक कुटुंबांच्या जगण्याशी संबंधित प्रश्न म्हणून पाहावे आणि सहकार्य करावे, असं आवाहन महाराष्ट्र नाभिक महामंडळाने केलं आहे.

प्रीमियम, एसी, साधे तसेच ग्रामीण भागातील सलूनसाठी स्वतंत्र दरपत्रक जाहीर करण्यात येणार आहे. सध्या प्रीमियम सलूनमध्ये दाढीसाठी 200 ते 500 रुपये, एसी सलूनमध्ये 100 ते 200 रुपये, साध्या सलूनमध्ये 50 ते 80 रुपये तर ग्रामीण भागातील सलूनमध्ये 50 ते 70 रुपये आकारले जातात. तसेच केस कापण्यासाठी प्रीमियम सलूनमध्ये 500 ते 1000 रुपये, एसी सलूनमध्ये 150 ते 350 रुपये, साध्या सलूनमध्ये सुमारे 150 रुपये आणि ग्रामीण भागात 80 ते 100 रुपये शुल्क आकारले जाते.

ग्राहक नाराज

दरम्यान, ग्राहकांकडून या दरवाढीबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत असून, वाढलेल्या दरांचा आर्थिक भार सर्वसामान्यांना परवडणारा नसल्याचे मत व्यक्त केले जात आहे. सलून सेवांचे दर स्थिर ठेवावेत, अशी मागणीही ग्राहकांकडून करण्यात आली आहे.

Follow Us
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप