AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जागा आमचीच, उमेदवारही आमचाच; विधानपरिषदेसाठी शिंदे गटाकडून कोणाचे नाव निश्चित, कोणाला डच्चू? संभाव्य यादी समोर

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून शिवसेना शिंदे गटाने ५ जागांवर दावा केला आहे. यातच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जालना दौऱ्यामुळे राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला आहे.

जागा आमचीच, उमेदवारही आमचाच; विधानपरिषदेसाठी शिंदे गटाकडून कोणाचे नाव निश्चित, कोणाला डच्चू? संभाव्य यादी समोर
eknath shinde
| Updated on: May 27, 2026 | 9:01 AM
Share

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यामुळे सध्या राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला आहे. विधानपरिषदेच्या जागांवरून महायुतीत अंतर्गत चर्चा आणि जागावाटपाचे गणित मांडले जात आहे. त्यातच आता शिवसेना शिंदे गटात विधानपरिषदेचे तिकीट मिळवण्यासाठी इच्छुकांनी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे. शिवसेनेने किमान ५ जागांवर दावा केला आहे. तसेच ६ वी जागा राजकीय बलाबल आणि गुणवत्तेच्या (मेरिट) आधारे मिळावी. यात छत्रपती संभाजीनगर किंवा रायगड यांपैकी एका जागेचा समावेश असावा, अशी आग्रही मागणी पक्षांतर्गत जोर धरू लागली आहे.

कोणत्या जागेसाठी कोण इच्छुक?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या जागांवर पक्षाकडून कोणाला संधी मिळणार, याबाबत सध्या चाचपणी सुरू आहे. यामुळे विधानपरिषदेच्या निवडणुकीबद्दल सध्या काही नेत्यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरु आहे. यात ठाणे-पालघर या अत्यंत प्रतिष्ठेच्या जागेवर माजी आमदार रवींद्र फाटक यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून लवकरच त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

हिंगोली-परभणी: माजी मंत्री अभिमन्यू खोतकर किंवा विप्लव बजोरिया यांच्या नावांची या जागेसाठी जोरदार चर्चा आहे.

छत्रपती संभाजीनगर-जालना: या जागेसाठी राजेंद्र जंचाळ किंवा बाजीराव चव्हाण यांच्यात मुख्य स्पर्धा असल्याचे दिसून येत आहे.

नाशिक: नाशिकमधून माजी खासदार हेमंत गोडसे, सईद खान आणि भाऊसाहेब चौधरी हे शर्यतीत आहेत.

रायगड: रायगडमधून भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांच्या नावाची चर्चा असून ही जागा पक्षाकडे खेचण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

जळगाव: जळगावातून गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र प्रतापराव पाटील यांच्या नावाची चाचपणी सुरू आहे.

खासदार श्रीकांत शिंदे आज जालना दौऱ्यावर 

याच पार्श्वभूमीवर, शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आज जालना जिल्हा दौऱ्यावर येत असल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष या दौऱ्याकडे लागले आहे. आगामी विधानपरिषद निवडणूक आणि त्यानंतर होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. खासदार श्रीकांत शिंदे या दौऱ्यात शिवसेना आणि युवासेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असून त्यांना आगामी निवडणुकांसाठी मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीला खासदार संदिपान भुमरे, माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह स्थानिक नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान विधानपरिषदेच्या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर-जालना या जागेचा पेच पाहायला मिळत आहे. हा मतदारसंघ शिवसेनेचा पारंपारिक बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे ही जागा कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेकडेच राहावी, अशी आग्रही मागणी स्थानिक कार्यकर्त्यांकडून श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली जाण्याची शक्यता आहे. या जागेबाबत शिंदे काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

&

Follow Us
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त