झणझणीत भरीत, झुणका भाकरी आणि पुरणपोळी, वंदे भारतमध्ये खास मेन्यू, मुंबईहून..

रेल्वे प्रवास आरामदायी असतो. जवळपास लोकांना रेल्वे प्रवास आवडतो. रेल्वेकडून प्रवाशांना जेवणही दिले जाते. त्यातच आता मोठा बदल करण्यात आला. अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीचे जेवण प्रवाशांना मिळणार आहे.

झणझणीत भरीत, झुणका भाकरी आणि पुरणपोळी, वंदे भारतमध्ये खास मेन्यू, मुंबईहून..
Vande Bhara
| Updated on: Nov 18, 2026 | 1:20 PM

रेल्वे प्रवास जवळपास लोकांना आवडतो. रेल्वे प्रवास म्हटले की, आराम होतो. शिवाय फार काही धावपळ होत नाही. आरामात झोपून तुम्ही प्रवास करू शकता. सर्व लोक दूर कुठे जायचे असेल की, रेल्वेनेच जातात. यासोबतच रेल्वेत फक्त प्रवासच आरामदायी नाही तर जेवणाचेही टेन्शन राहत नाही. आजकाल जवळपास रेल्वेत गरमागरम जेवण उपलब्ध असते. रेल्वेची तिकिट बूक करतानाच तिथे पर्याय दिली जातात. 20 ते 30 तासाच्या प्रवासात गरम आणि ताजे जेवण मिळते. जवळपास रेल्वेंमध्ये वरण, भात, फुलके, पनीरची भाजी, सलाड, दही आणि काहीतरी गोड पदार्थ दिला जातो. जेवण झाल्यानंतर आयस्क्रीमही दिले जाते. जेवणाचा आस्वाद घेत प्रवास अधिक आरामदायी होतो. आता वरण, भात, पनीरची भाजी आणि फुलक्यांऐवजी प्रवाशांना वेगळा मेन्यू मिळणार आहे. मुंबई बंगळूरू वंदे भारत शयनयान एक्सप्रेसमध्ये आता अस्सल महाराष्ट्रीय पारंपरिक खाद्यपदार्थ मिळणार आहेत.

पुरणपोळीपासून थेट झुणका आणि वांग्याचे झणझणीत भरीतही मिळणार आहे. भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळ (आयआरसीटीसी) याचे नियोजन करत आहे. विचार करा प्रवासात तुम्ही पुरणपोळीसह झुणका भाकरीवर ताव मारू शकणार आहात. मुंबईहून बंगलूरूला जाणाऱ्या वंदे भारत शयनयान एक्सप्रेसमध्ये ही सुविधा मिळणार आहे.

Loading...

राज्याची खाद्यसंस्कृतीची ओळख करून देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्रीयन घरात सणावाराला पुरणपोळी बनते. जवळपास लोकांना पुरणपोळी आवडते. पुरणपोळीसोबतच झणझणीत वांग्याचे भरीत आणि झुणका अर्थात पीठलंही मिळणार आहे. आयआरसीटीसीने प्रवाशांच्या खाद्यपदार्थांच्या आवडीनिवडी जाणून घेण्यासाठी चाचण्या घेतल्या.

त्यात सर्वाधिक वरचढ पुरणपोळी ठरली. रेल्वे मंडळाच्या खानपानविषयक नियमांमध्ये बसणाऱ्या पदार्थांची निवड करून तो प्रस्ताव पाठवला जाणार आहे. रेल्वे मंडळाने या पदार्थांना मंजुरी दिल्यानंतर हे पदार्थ प्रत्यक्षात प्रवाशांना मिळणार आहेत. हा एक मोठा बदल असणार आहे. कारण आतापर्यंत पनीरची भाजी किंवा मिक्स व्हेजच जेवणात बघायला मिळायची. आता यात बदल होण्याची चिन्ह आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us