AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इथे ओशाळली माणुसकी ! डिझेलसाठी पैसे मागितले, बेशुद्ध मुलीला रुग्णवाहिकेतून उतरवलं; हतबल बापाने खांद्यावरून गाठलं रुग्णालय

माजलगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पैशांअभावी एका बेशुद्ध चिमुरडीला रुग्णवाहिकेतून खाली उतरवण्यात आले. डिझेलच्या पैशांवरून वाद झाल्यावर, मुलीला पुढील उपचारांपासून वंचित ठेवण्यात आले. हताश पित्याने बेशुद्ध मुलीला खांद्यावर घेत दुसऱ्या रुग्णालयात नेले. या घटनेमुळे आरोग्य व्यवस्थेतील असंवेदनशीलता व वैद्यकीय दुर्लक्ष समोर आले आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

इथे ओशाळली माणुसकी !  डिझेलसाठी पैसे मागितले, बेशुद्ध मुलीला रुग्णवाहिकेतून उतरवलं; हतबल बापाने खांद्यावरून गाठलं रुग्णालय
| Updated on: Oct 14, 2026 | 3:17 PM
Share

पैसा खुदा तो नहीं, पर खुदा की कसम, खुदा से कम भी नहीं। हे वाक्य तुम्ही- आम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल. आजच्या काळात तर पैशाला अनन्य साधारण महत्व आहे. मात्र याच पैशांअभावी एखाद्याचा जीव धोक्यात आला किंवा उरपचार नाकारले गेले तर ? दरम्यान, बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात माणुसकीला काळिमा फासणारा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पैशांअभावी एका बेशुद्ध चिमुरडीला अँब्युलन्समधून खाली उतरवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. फिट आल्याने बेशुद्ध पडलेल्या पाचवीत शिकणाऱ्या चिमुरडीला पुढील उपचारांसाठी घेऊन जाण्यासाठी शासकीय रुग्णवाहिका मागण्यात आली. मात्र, डिझेलच्या पैशांवरून वाद झाल्यानंतर मुलीला रुग्णवाहिकेतून खाली उतरवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे आरोग्य व्यवस्थेच्या संवेदनशीलतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

नेमकं काय घडलं ?

दिंद्रुड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाचवीत शिकणाऱ्या एका मुलीला फिट आल्याने उपचारासाठी आणण्यात आलं होतं. मुलगी बेशुद्ध असल्याने तिला पुढील उपचारांसाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देत रेफर लेटर देण्यात आले. मात्र, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने खासगी वाहनाने मुलीला घेऊन जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे मुलीच्या आजीने शासकीय रुग्णवाहिकेची मागणी केली. रुग्णवाहिकेत मुलीला घेऊन तिचे वडील बसल्यानंतर डिझेलसाठी पैशांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे.

‘आम्ही मोलमजुरी करून जगतो. आमच्याकडे पैसे नाहीत,’ असे कुटुंबीयांनी सांगितल्यानंतर डॉक्टरांनी कथितरीत्या, ‘पैसे नाहीत तर मुलीला जन्मच कशाला दिला?’ असा संतापजनक सवाल केल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यानंतर मुलीला रुग्णवाहिकेतून खाली उतरवण्यात आलं, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

हतबल बापाने मुलीला खांद्यावर घेतलं

मुलीला तातडीने उपचार मिळणे गरजेचे असताना रुग्णवाहिकेतून खाली उतरवल्यामुळे वडिलांसमोर मोठे संकट उभे राहिले. दुसरा पर्याय नसल्याने हताश बापाने आपल्या बेशुद्ध मुलीला खांद्यावर घेत दुसऱ्या रुग्णालयाकडे धाव घेतली. तेथे मुलगी शुद्धीवर आल्यानंतर कुटुंबीय तिला घरी घेऊन गेले. या मुलीने सहा वर्षांपूर्वीच आई गमावली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जगणाऱ्या या कुटुंबाला मुलीच्या उपचारांसाठी आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन मदत करावी, अशी मागणी कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान शासकीय आरोग्य केंद्रात उपचारासाठी आलेल्या गरीब रुग्णाच्या कुटुंबाला अशा प्रकारच्या वक्तव्याला सामोरे जावे लागल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध असतानाही डिझेलसाठी पैसे मागितल्याचा आरोप गंभीर असून, या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी फोनवरून बोलताना दोषी डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना डॉक्टर निलेश ढाकणे यांनी सांगितले की, रुग्णाला आणण्यात आले तेव्हा ती बेशुद्ध होती. तिला शुद्धीवर आणण्यासाठी त्यांनी स्वतःच्या पैशांतून इंजेक्शन दिल्याचेही त्यांनी म्हटले. ‘मात्र, माझ्या तोंडून जे काही शब्द गेले आहेत, त्याची पुनरावृत्ती यापुढे होणार नाही, याची मी काळजी घेईन,’ असे डॉक्टर निलेश ढाकणे यांनी सांगितल्याचे समजते. दरम्यान गावकऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन जाब विचारला असता डॉक्टरांनी माफी मागितली असून यापुढे असा प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी असं गावकऱ्यांनी म्हटलं आहे.

Follow Us
बीडमध्ये भीषण पाणीटंचाई! 375 गोवंश तहानलेले, गोशाळेला टँकरवर अवलंबून..
बीडमध्ये भीषण पाणीटंचाई! 375 गोवंश तहानलेले, गोशाळेला टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ
ऐन नवरात्रीत तुळजापुरात दोन गटांत वाद, नेमकं काय घडलं?
Dharashiv : ऐन नवरात्रीत तुळजापुरात दोन गटांत वाद, नेमकं काय घडलं?
दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला.....
Rahul Gandhi PC : दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला धक्कादायक अनुभव
राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?
Sangli NCP : समान नागरी कायद्याच्या विरोधाची भूमिका भोवली? राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?
ज्ञानेश कुमारांविरोधात मनसेचं अनोखं आंदोलन; सेल्फी विथ ज्ञानू....
MNS : ज्ञानेश कुमारांविरोधात मनसेचं अनोखं आंदोलन; सेल्फी विथ ज्ञानू....
MPSC आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन....
MPSC आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन; नेमकी चर्चा काय?
दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढत नांदेडच्या शेतकऱ्याची मोठी कामगिरी!
दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढत नांदेडच्या शेतकऱ्याची मोठी कामगिरी! आधी प्रयोग केला अन् नंतर 20 गुंठ्यात...
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीस...
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीसांनी केली थेट घोषणा
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया,
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग; नेमकं काय घडलं?