AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नालासोपाऱ्यात पार्किंगमध्ये उभ्या वाहनांना भीषण आग, 7-8 टेम्पो जळून खाक

नालासोपारा पूर्व धणीवबाग येथे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये सात ते आठ माल वाहतुकीचे ट्रक जळून खाक झाले. मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

नालासोपाऱ्यात पार्किंगमध्ये उभ्या वाहनांना भीषण आग, 7-8 टेम्पो जळून खाक
| Updated on: Feb 01, 2024 | 10:37 AM
Share

विजय गायकवाड , टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 1 फेब्रुवारी 2024 : नालासोपारा पूर्व धणीवबाग येथे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये सात ते आठ माल वाहतुकीचे ट्रक जळून खाक झाले. मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल मध्यरात्रीच्या सुमारास पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना आग लागून मोठे स्फोट झाल्याने आजूबाजूचे नागरिक भयभीत होऊन रस्त्यावर उतरले होते. या आगीच्या भडक्यात केमिकल असलेल्या ट्रेकला आग लागल्याने, त्यात मोठे स्फोट झाले. या स्फोटामुळे एक ते दीड किलोमीटर पर्यंतच्या परिसरातील घर, बंगले यांना फटका बसला असून, आजूबाजूच्या घरांच्या काचाही तुटल्या आहेत. अनेक नागरिक रस्त्यावर उतरले.

आगीची बातमी कळताच, स्थानिक नगरसेवक पंकज पाटील यांनी तात्काळ वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केले. त्यांनी सुमारे तासभर अथक प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले आहे. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे स्पष्ट झाले नाही. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Follow Us
मिसिंग लिंकवर दरड... त्यालाही नेहरूच जबाबदार?
Sandeep Deshpande | मिसिंग लिंकवर दरड... त्यालाही नेहरूच जबाबदार? संदीप देशपांडेंचा फडणवीस सरकारला खोचक टोला
महापूर! नद्यामधील पाण्याची पातळी वाढली, ढगफुटीची शक्यता... धो धो धो
महापूर! नद्यामधील पाण्याची पातळी वाढली, ढगफुटीची शक्यता... धो धो धो बरसणार पाऊस; पुढील 24 तास...
संत तुकोबांच्या पालखीवर पावसाचं सावट! देहूत गर्दी करू नका
संत तुकोबांच्या पालखीवर पावसाचं सावट! देहूत गर्दी करू नका; सुनेत्रा पवारांचं मोठं आवाहन
मोठी बातमी! 19 तासांत हटवला 100 टन मलबा! मुंबई-पुणे महामार्ग पुन्हा...
मोठी बातमी! 19 तासांत हटवला 100 टन मलबा! मुंबई-पुणे महामार्ग पुन्हा झाला सुरू
दिल्लीकडे मुख्यमंत्री फडणवीसांची धाव!; मंत्रिमंडळ विस्ताराच्या....
CM Devendra Fadnavis | दिल्लीकडे मुख्यमंत्री फडणवीसांची धाव!; मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांदरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचाली?
गोदावरी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ; दुतोंड्या मारुतीपर्यंत...
Nashik Godavari River | गोदावरी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ; दुतोंड्या मारुतीपर्यंत पोहचलं पाणी; नाशिकला ढगफुटीचा इशारा
नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी..
Big Breaking | नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी निदा खानला...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची महत्त्वाची बैठक सुरू, बारामतीतील...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने प्रवाशांना त्रास!
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारण
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारणारं दृश्य