AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Fire : जोगेश्वरीत इमारतीला मोठी आग, अनेक मजले भक्ष्यस्थानी, जीवितहानी नाही

मुंबईत आगीचे सत्र सुरूच आहे. मुंबईतील जोगेश्वरी येथील एका इमारतीमध्ये भीषण आग लागली. अनेतक मजले आगीच्या विळख्यात अडकले होते.

Mumbai Fire : जोगेश्वरीत इमारतीला मोठी आग, अनेक मजले भक्ष्यस्थानी, जीवितहानी नाही
Jogeshwari Building fire Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Oct 23, 2025 | 3:22 PM
Share

दोनच दिवसांपूर्वी नवी मुंबईत आगीच्या दोन घटना घडल्या त्यात 6 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जखमी झाले. त्यानंतरही मुंबईत आगीचे सत्र सुरूच आहे. मुंबईतील जोगेश्वरी येथील एका इमारतीमध्ये भीषण आग लागली. आगीचे वृत्त मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले.  या इमारतीचे 4 मजले आगीच्या विळख्यात सापडले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अागीचे वृत्त समजताच तातडीने आलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनी ही आग आटोक्यात आणण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी पश्चिमेकडील बेहराम बाग जेएनएस बिझनेस पार्कमध्ये ही आग लागली. कमर्शिअल अशा या  हाय-राईज बिल्डींमध्ये ही भीषण आग लागली. त्यानंतर तातडीने तेथे येऊन, आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्न सुरू केले. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे कारण स्पष्ट झालेलं नाही.  या इमारतीच्या अगदी वरच्या मजल्यावर असलेल्या रहिवाशांकडून मदतीसाठी बचावासाठी हाका मारल्या जात होत्या . त्यांचा जीव वाचवून सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी देखील फायर ब्रिगेडचे जवान कसून प्रयत्न करत होते.

जोगेश्वरीत उंच इमारतीला आग, जीवितहानी  नाही

रिपोर्ट्सनुसार, आज सकाळी जोगेश्वरी पश्चिम येथील जेएनएस बिझनेस सेंटरमध्ये आग लागली. गांधी शाळेजवळील बेहरामपाडा येथील एस.व्ही. रोडवरील एका उंच इमारतीत आग लागली. आग लागताच परिसरात मध्ये घबराट पसरली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) मुंबई अग्निशमन दलाला (एमएफबी) 10:51 वाजता या घटनेची माहिती मिळाली.  मुंबई अग्निशमन दलाने लगेच घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन लेव्हल-2 घोषित केले.

या आगीत आतापर्यंत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.  आग कशी लागली, त्याचं कारण अद्याप कळलेले नाही. अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. अखेर बऱ्याच प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवून ती आटोक्यात आणली. तसेच अग्निशमन दलाच्या जवानांकडून इमारतीत अडकलेल्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Follow Us
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...
शिवसेना सुनावणीच्या अखेरीस कोर्टाची मोठी टिप्पणी, विधीमंडळ पक्ष...
Shivsena : आजच्या सुनावणीच्या अखेरीस कोर्टाची मोठी टिप्पणी, विधीमंडळ पक्ष चाचणीचे महत्त्व...
शिवसेना कुणाची? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद; म्हणाले, फुटी..
Shivsena Hearing Upadate : शिवसेना कुणाची? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद; म्हणाले, फुटीनंतरही...
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणा..
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणासह शेतकरी मदतीबाबत काय म्हणाले?
जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं...
Bajrang Sonavane | जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं मोठं वक्तव्य
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या...
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या वडनगरहून रस्ते मार्गाने रवाना
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन
Devendra Fadnavis | शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन; 5 ऑक्टोबरनंतर पंचनामे होणार
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात...
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात मोठ्या हालचाली