AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राची वाघिण कुस्तीपटू अश्विनी पौळ प्रकरणात धक्कादायक अपडेट, थेट मुलीचाही..

कुस्तीपटू अश्विनी मनोहर पौळ यांनी घेतलेल्या निर्णयाने खळबळ उडाली. अश्विनी पौळ प्रकरणात मोठी अपडेट येत आहे. शेवटची अपेक्षाही संपली आहे. अश्विनी यांच्या कुटुंबियांकडून गंभीर आरोप करण्यात आलीत.

महाराष्ट्राची वाघिण कुस्तीपटू अश्विनी पौळ प्रकरणात धक्कादायक अपडेट, थेट मुलीचाही..
Ashwini Paul
| Updated on: Sep 06, 2026 | 7:20 AM
Share

धाराशिवच्या ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यात हृदयद्रावक घटना घडली. कुस्तीच्या खेळाडू असलेल्या अश्विनी मनोहर पौळ यांनी आपल्या तीन लहान मुलांना घेऊन किल्ल्यातील उपळी बुरुजावरून उडी घेतली. या घटनेने एकच खळबळ उडाली. अश्विनी पौळ आणि त्यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य यांचा मृत्यू झाला. अडीच वर्षांच्या दुसऱ्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एका मुलीवर धाराशिव येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. अश्विनी पौळ या तीन मुलांसह नळदुर्ग किल्ला पाहण्यासाठी आल्या होत्या. यावेळी त्या केक आणि चॉकलेट घेऊन किल्ल्यावर पोहोचल्या होत्या. किल्ल्याच्या गेटजवळच त्यांनी केक कट केला आणि लेकरांना खाऊ घातला. यासोबतच किल्ल्यावरील कर्मचाऱ्यांना रजिस्टरवर नोंदणी करताना माझा नवरा मागून येत असल्याचे सांगितले.

त्यानंतर पुढे जे घडले, त्याचा साधा विचारही कोणी केला नव्हता. कुस्तीपटू अश्विनी यांच्या मुलीवर धाराशिव येथे उपचार सुरू होते. मात्र, तिची अखेरची झुंज संपली आहे. नळदुर्ग किल्ला कुस्तीपटू जीवन संपवल्याच्या प्रकरणातील चौथा मृत्यू झाला. उपचार सुरू असलेल्या वीराचा मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून जीवन संपले होते.

आई, मुलगा आणि एका मुलीचा  मृत्यू झाला होता. तर एका मुलीवर धाराशिवच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यात गुरुवारी घडलेली घटना हृदयद्रावक होती. राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू अश्विनी मनोहर पौळ यांनी आपल्या तीन लहान मुलांसह किल्ल्याच्या उंच बुरुजावरून उडी घेतल्याची धक्कादायक घटना घडली होती.

या दुर्घटनेत अश्विनी पौळ त्यांचा साडेपाच वर्षीय मुलगा अजिंक्य आणि जुळ्या मुलींपैकी क्रांती हिचा मृत्यू झाला, तर दुसरी मुलगी वीरा गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, तिला वाचवण्यात यश मिळाले नाही. पोलिस या प्रकरणात तपास करत आहे. माहेरच्या लोकांकडून गेल्या काही दिवसांपासून अश्विनी यांना त्रास दिला जात होता. पोलिसांनी अश्विनी यांच्या कुटुंबियांवर गुन्हा देखील दाखल केला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...