AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगेंनी लावली 2029 च्या निवडणुकीची फिल्डिंग; नारायगडावरील मेळाव्यातून मराठ्यांना दिला मोठा आदेश

मनोज जरांगेंनी 2029 च्या निवडणुकीसाठी मोठी फिल्डिंग लावली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण न दिल्यास सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

मनोज जरांगेंनी लावली 2029 च्या निवडणुकीची फिल्डिंग; नारायगडावरील मेळाव्यातून मराठ्यांना दिला मोठा आदेश
MANOJ JARANGE PATIL (5)Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 20, 2026 | 2:17 PM
Share

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस सरकारला मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणासाठी तीन महिन्यांचा अवधी दिला आहे. परंतु सत्ताधाऱ्यांनी आरक्षणाकडे दुर्लक्ष केल्यास परिणामाला जावे लागेल, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे. नारायणगडावरील मेळाव्यातून मनोज जरांगे यांनी सरकारला पुन्हा अल्टिमेटम दिला आहे. मराठ्यांच्या विरोधात जाईल, त्याला 2029 सालच्या निवडणुकीत निवडून द्यायचं नाही, अशा शब्दात जरांगेंनी इशारा दिला.

बीडच्या नारायण गडावर मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा पार पडला. नारायगडावरील मेळाव्यात मराठा बांधवांनी मोठी गर्दी केली.  या मेळाव्यात जरांगे हे महंत शिवाजी महाराज आणि जरांगे पाटील नगद नारायणाचे दर्शन घेऊन दसरा मेळाव्याच्या व्यासपीठाकडे पोहोचले. त्यानंतर मनोज जरांगे पाटील म्हणाले,  लोक कशासाठी झुंजत आहे. आपण कशासाठी झुंज देत आहोत, हे सर्वांना समजून द्या. याची जाणीव मराठ्यांना असू द्या. तीन वर्षांपासून समाज संघर्ष करत  आहे. कोणाचा काय शब्द आहे, ते समजून घेतले पाहिजे. लोकांचा जीव चालला आहे, पक्ष आणि नेता मोठा करण्यात चालला आहे. तुमचा आणि आमचा जीव चालला आहे, आपल्या समाजाची पत वाढवण्यासाठी चालली आहे. कोणत्याही नेत्यावर संकट आलं की, आपला समाज पांघरून घालतो. समाजाने सोडले तर यांना तुरुंगात जावं लागतं. त्यामुळे समाज मोठा झाला पाहिजे. समाज जर बरबाद झाला, तर तुम्ही आणि आम्ही उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. ही झुंज कशासाठी आहे, हा आक्रोश कशासाठी आहे, तर समाज मोठा होण्यासाठी आहे’.

‘पहिलं काम सांगतो… राज्यातील मराठा सेवक …दुसरा काम…निघालेल्या कुणबी नोंदी… एसईबीसी आक्षण आणि मराठा समाजाच्या अडचणी.. विषय तीन सांगितले आहेत. येथून पुढे विजयादशमीनंतर या राज्यात घराघरात ज्यांना मराठा सेवक व्हायचं आहे, त्यांना मोबाईल नंबर दिला जाईल. त्या नंबरवरून घराघरातला मराठा सेवक होऊ शकतो. त्यावर नाव-गाव पत्ता पाठवायचा आहे. ज्यांना प्रमाणपत्र मिळत नाही. ज्यांचा अर्ज घेतला जात नाही. नोंद सापडूनही अर्ज स्वीकारला जात नाही. अर्ज केल्यानंतरही कुणबी प्रमाणपत्र, जात पडताळणी केली जात नाही. त्यासाठी एक वेगळा नंबर दिला जाईल. कोणता अधिकारी कसा दाखला देत नाही, ते बघतोच. त्यासाठी वेगळा नंबर दिला आहे. तिसरा मुद्दा..मराठा समाजाच्या अडचणीसाठी एक नंबर देत आहे. फोन करू नये. फक्त मेसेज पाठवावा. आरक्षण, मराठा सेवक आणि अडचणी-समस्यासाठी वेगळा नंबर आहे, असे जरांगेंनी सांगितले.

‘दुष्काळ पडलाय. समाजातील 80 टक्के लोकांचं हातावर पोट आहे. शेतीत पिकलं नाही, तर तो जगू शकत नाही. हे मूळ कारण आहे. समाज आपल्याला मोटा करायचा आहे. जर घरात एखादा नोकरीला असेल, दुष्काळ काय किंवा दुसरं काही…तरी तुम्ही घाबरले नसते. कारण त्यावेळी मुलगा किंवा मुलाने पैसे पाठवले असते. दुष्काळ पडला तर पडला. आता आधार ठेवला नाही. ज्यांना आधार म्हणून निवडून दिलं, ते तुमच्या विरोधात काम करू लागले आहेत.  सगळ्यात जास्त कंस मामाला धुणार होतो. पण मी शब्दाला पक्का आहे. मराठे कुणाच्याच जिवावर नाहीत, आम्ही आमच्याच जिवावर आहेत. समाज मोठा करायला पाहिजे होता पण तुम्ही फक्त तुमचे घर भरले. समाजाची मान खाली होईल, असं एकही पाऊल मी उचललेलं नाही  मी माझ्या समाजासाठी लढायचं नाही? जो जो नेता, जो पक्ष मराठ्यांच्या विरोधात जाईल, तो 2029 ला निवडून येऊ द्यायचा नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला.

Follow Us
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!
लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोईचा ताबा मिळणार? मुंबई पोलिसांना...
लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोईचा ताबा मिळणार? मुंबई पोलिसांना केंद्राच्या परवानगीची प्रतीक्षा!
दसऱ्यानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं! 2 टन फुलांनी...
दसऱ्यानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं! 2 टन फुलांनी सजलेला गाभारा पाहून भाविक मंत्रमुग्ध