AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! अखेर मनोज जरांगे पाटलांनी आरक्षणाचा लढा जिंकला, सरकारच्या 5 सर्वात मोठ्या घोषणा

मोठी बातमी समोर येत आहे. अखेर मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या लढ्याला मोठं यश आलं आहे. आज सरकारच्या वतीने भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे.

मोठी बातमी! अखेर मनोज जरांगे पाटलांनी आरक्षणाचा लढा जिंकला, सरकारच्या 5 सर्वात मोठ्या घोषणा
manoj jarangeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 02, 2026 | 9:20 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे. अखेर मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या लढ्याला मोठं यश आलं आहे. आज सरकारच्या वतीने भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. सरकारच्या वतीने पाच मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. ते उपोषणाल बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. दरम्यान आज सरकारच्या वतीने प्रसाद लाड यांनी त्यांची भेट घेतली आहे. यावेळी प्रसाद लाड यांनी पाच मोठ्या घोषणा केल्या आहेत. जरांगे पाटील यांच्या सर्व अटी सरकारने मान्य केल्याची माहिती यावेळी प्रसाद लाड यांनी दिली आहे.

सरकारच्या पाच मोठ्या घोषणा कोणत्या?

ओबीसी समाजाला ज्या -ज्या सवलती मिळतात त्या सर्व सवलती मराठा समाजाला देखील मिळणार असल्याचं प्रसाद लाड यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे दुसरी सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे जरांगे पाटील यांनी सरकारकडे मागणी केली होती, हैदराबाद गॅझेनुसार कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजेत, ती अट देखील सरकारने यावेळी मान्य केली आहे. हैदरबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र मिळतील असं प्रसाद लाड यांच्यावतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. बार्टी महाज्योतीप्रमाणेच सारथीही यशस्वीरित्या राबवू असं अश्वासन देखील यावेळी प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिलं आहे. त्याचप्रमाणे मंत्रालयात मराठा कक्षासाठी कार्यालय देणार असल्याचं देखील यावेळी प्रसाद लाड यांनी जाहीर केलं आहे. त्याचप्रमाणे राज्यात 58  लाख कुणबी प्रमाणपत्राचं वाटप सरकारकडून होणार असंही प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.

मी उद्या मंत्र्यांना घेऊन अंतरवाली सराटीमध्ये येतो, जरंगे पाटील यांनी उपोषण सोडावं अशी विनंती देखील यावेळी प्रसाद लाड यांनी केली. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी उपोष सोडण्यास नकार दिला आहे, जोपर्यंत जीआर हातात येत नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. आधी हैदराबाद गॅझेनुसार प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात करा मग उपोषणाचं बघू असंही यावेळी ते म्हणाले आहेत. आता पाणी पितोय, सलाईन लावतो, परंतु उपोषण सोडणार नाही, सातारा, कोल्हापूर गॅझेटसाठी सरकारला दोन दिवसांचा वेळ देतो, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट