AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

500 कोटींचा बॉम्ब फोडल्यानंतर मनोज जरांगेंची मोठी मागणी, थेट..

मनोज जरांगे पाटील यांच्या 500 कोटींच्या दाव्यावर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली. त्यातच आता पुन्हा जरांगे यांनी मोठे विधान केले. त्यांनी सखोल चाैकशी या प्रकरणाची झाली पाहिजे, असे विधान केले.

500 कोटींचा बॉम्ब फोडल्यानंतर मनोज जरांगेंची मोठी मागणी, थेट..
Manoj Jarange Patil
| Updated on: Oct 23, 2026 | 12:58 PM
Share

मनोज जरांगे पाटील यांनी भाजपाकडून एकनाथ शिंदे यांनी 500 कोटी रूपये मला देण्यासाठी घेतल्याचा गंभीर आरोप केला. त्यांच्या या आरोपाने खळबळ उडाली. त्यानंतर थेट त्यांनी या संदर्भातील ऑडिओ क्लिपच मीडिया ऐकून दाखवली. या क्लिपमध्ये थेट 500 कोटींचा उल्लेख करण्यात आला. या क्लिपमध्ये मनोज जरांगे पाटील यांना 500 कोटी रुपये मिळाल्याचा उल्लेख आहे. हे पैसे श्रीकांत शिंदे यांच्याकडून मिळाल्याचेही नमूद केले. या ऑडिओ क्लिपमध्ये जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीत आमच्या फायद्याचे ठरतील की नाही, यावर चर्चा असल्याचे ऐकू येते. या ऑडिओ क्लिपनंतर आरोप प्रत्यारोपाचे सत्र रंगले आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांच्याकडून या ऑडिओ क्लिपची चाैकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली जात आहे. उदय सामंंत यांनी भाजपाच्या नेत्यांचा हा आवाज असल्याचे सांगत चाैकशी व्हायला पाहिजे, असे थेट म्हटले.

मनोज जरांगे पाटील यांनी ऐकवलेल्या या ऑडिओ क्लिपमध्ये महायुतीमधील नेते एकमेकांच्या समोर आल्याचे दिसतंय. या ऑडिओ क्लिपनंतर मनोज जरांगे पाटील यांनी मोठे विधान केले. जरांगे पाटील यांनी म्हटले की, याच्या मुळाशी जाणे खूप जास्त महत्वाचे आहे. तुम्हाला ज्याकाही यंत्रणा लावता येतील, त्या लावा. मग ते एसआयटीपासून ते सीआयडीपर्यंत त्या लावा.

याचा छडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही लावला पाहिजे. फक्त निवेदन दिले म्हणून दिले असे नाही. खरे काय हे पुढे आले पाहिजे. जर तुम्ही तुमच्या सत्तेचा दुरूपयोग केला तर त्यातून काहीच पुढे येणार नाही. कारण हा खूप जास्त मोठा विषय आहे. तुम्ही पळ वाटा शोधू नका.

प्रत्येक पक्षाच्या मंत्र्यांसाठी हे आहे, मग ते भाजपाचे मंत्री असो किंवा ते शिवसेनेचे. आपली बाजू सुरक्षित करायचे म्हणून म्हणायचे म्हणून नका म्हणू. तुम्ही कोणत्याही पक्षाचे आहात पण याच्या मुळाशी जाणे खूप जास्त महत्वाचे आहे. कारण हा विषय खूप जास्त गंभीर विषय आहे. असे कसे होऊ शकते आणि इतका गंभीर विषय कसा होऊ शकतो? यात एकनाथ शिंदे यांच्या मुलाचे नाव आहे.

Follow Us
AI चा बहाणा करू नका, सत्य बाहेर काढा; ऑडिओ क्लिपवरून जरांगे संतप्त
Manoj Jarange Patil : AI चा बहाणा करू नका, सत्य बाहेर काढा; कथित ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे पाटील संतप्त
जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की बनावट? देवेंद्र फडणवीस म्हणाले....
CM Devendra Fadnavis : जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की बनावट? देवेंद्र फडणवीस म्हणाले, संपूर्ण फॉरेन्सिक तपासणी...
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, तब्बल 1 लाख....
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, तब्बल 1 लाख 15 हजार 697 शेतकऱ्यांना मिळणार लाभ
7 महिन्यांपासून पगार नाही; कामगार मंत्र्यांचा सासवड नगरपरिषदेला दणका
Pune : 7 महिन्यांपासून पगार नाही, 230 कामगार संकटात; कामगार मंत्र्यांचा सासवड नगरपरिषदेला दणका
शिंदेसेनेचे आमदार दिलीप लांडे यांना धक्का; मुलाचा पराभव अन् आणखी...
Dilip Lande : शिंदेसेनेचे आमदार दिलीप लांडे यांना धक्का; मुलाचा पराभव अन् आणखी...
नितेश कराळे मास्तरांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी; मास्तर ढसाढसा रडले
NCP : नितेश कराळे मास्तरांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी; मतदानाच्या काही तास आधी...कराळे मास्तर ढसाढसा रडले, नेमकं काय घडलं?
500 कोटींच्या आरोपांवर भाजप गप्प का? संजय राऊतांचा थेट सवाल...
Sanjay Raut : 500 कोटींच्या आरोपांवर भाजप गप्प का? संजय राऊतांचा थेट सवाल; अमित शहा, फडणवीस अन् शिंदेंना काय दिलं आव्हान
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान