AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदेंवर 500 कोटींचा बॉम्ब, थेट क्लिपमध्ये महाराष्ट्रातील बड्या महिला नेत्याबद्दल धक्कादायक भाष्य..

500 कोटींवरून विविध आरोप केले जात आहेत. यावरूनच आता मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी थेट ऑडिओ क्लिपच दाखवली. या ऑडिओ क्लिपने मोठी खळबळ उडाली. थेट गंभीर आरोप करण्यात आलीत.

मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदेंवर 500 कोटींचा बॉम्ब, थेट क्लिपमध्ये महाराष्ट्रातील बड्या महिला नेत्याबद्दल धक्कादायक भाष्य..
Manoj Jarange Patil and Eknath Shinde
| Updated on: Oct 22, 2026 | 12:01 PM
Share

500 कोटी घेतल्याचे आरोप केले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर हे आरोप होत आहेत. जरांगे पाटील यांच्या आरोपावर स्पष्टपणे बोलताना शिंदे दिसले. एकनाथ शिंदे यांनी आपल्याला 500 कोटी रुपये दिल्याचे भाजपला सांगितले असल्याचा दावा मनोज जरांगे पाटलांनी केला आहे. नारायाण गडावरील दसरा मेळाव्यात बोलताना त्यांनी हा आरोप केला. एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की, ना 500 कोटी घेतले ना 500 कोटी दिले. यावर शिंदेंनी दसरा मेळाव्यात उत्तर दिले नाही पण मुंबईतील दसरा मेळाव्यामध्ये शिंदेंच्या शिवसैनिकांनी जोरदार टीका केली. जरांगेंवर शिंदेंचे शिवसैनिक तुडून पडले. उदय सामंत यांनी थेट जरांगेंचा बोलवता धनी कोण आहे, त्याचे पुरावे शिंदेंकडे देणार असल्याचे म्हटले. आता जरांगे पाटील यांनी बॉम्ब फोडला. त्यांनी पत्रकार परिषद घेत राज्यात खळबळ उडवणारी ऑडिओ क्लिपच ऐकून दाखवली.

जरांगे यांनी ऐकवलेली ऑडिओ क्लिप अत्यंत मोठी आहे. त्यातच काही लोक संवाद साधताना दिसत आहेत. या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊतांसह अनेक नेत्यांची नावे घेण्यात आली. काही बातम्यांचे उदाहरणेही दिली गेली. त्यातच दोन व्यक्ती संवाद साधत असताना संजय राऊत यांच्यासोबतच शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याही नावाचा उल्लेख करण्यात आला.

सुषमा अंधारे यांचे नाव घेताना अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन बोलण्यात आले. त्या ऑडिओ क्लिपमध्ये म्हणण्यात आले की, अंधारे खूपच खालच्या लेव्हलला आहे. तिच्या नादाला लागायचे नाही… दुसरा व्यक्ती म्हणतो की, बरोबर आहे, त्यांच्या नादाला लागू नये पण. यावेळी काही लोक ऑडिओ क्लिपमध्ये हसतानाही दिसत आहेत.

फक्त संजय राऊत हेच नाही तर सुषमा अंधारे यांच्याबद्दलही बोलण्यात आले. तिच्या नादी लागू नका, असे त्यांनी म्हटले. या ऑडिओ क्लिपमुळे मोठे वादळ राज्याच्या राजकारणात आले. 500 कोटी कोणी घेतले, याचा विचार करा, असे स्पष्ट शब्दात मनोज जरांगे यांनी म्हटले. शिंदे गटाचे नेते मोठ्या प्रमाणात जरांगेंवर टीका करत असतानाच ही ऑडिओ क्लिप जरांगेंनी दाखवली.

Follow Us
मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने राजकीय वर्तुळात खळबळ
जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण..
Jarange Patil Viral Audio Clip : जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा....
Manoj Jarange On Eknath Shinde : 500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा, पुढे काय म्हणाले?
मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; श्रीकांत शिंदेंचंही नाव, जरांगे काय खुलासा करणार?
पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या....
Sanjay Raut : पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या दौऱ्याचा उल्लेख करत काय म्हणाले?
मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश; दोन किलो सोन्यासह....
Mumbai Airport : मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश; दोन किलो सोन्यासह....
मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचं प्रदूषित शहर; AQI थेट...
Mumbai Air Pollution : मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचं प्रदूषित शहर; नागरिकांच्या आरोग्याला धोका, AQI थेट...
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल