AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता असं झालंय की मला सुद्धा करमत नाही, मी जिवंत.. आंतरवालीच्या त्या आरोपांवर जरांगेंचं थेट विधान

आगामी दसरा मेळावा परंपरेनुसार पार पडेल, परंतु दुष्काळी परिस्थितीमुळे तो साधेपणाने केला जाईल असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

आता असं झालंय की मला सुद्धा करमत नाही, मी जिवंत.. आंतरवालीच्या त्या आरोपांवर जरांगेंचं थेट विधान
manoj jarange patil
| Updated on: Sep 29, 2026 | 8:23 PM
Share

मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांच्याच सहकाऱ्यांनी गंभीर आरोप केले आहेत. अमोल खुणे, अजय बारस्कर यांच्या सोबत आता गावातील महिला सहकाऱ्यांनी देखील त्यांना टार्गेट केले आहे.  या आंदोलनाचा आपल्या काही फायदाच झाला नाही असा आरोप जरांगे यांच्या सहकारी महिलांनची केला आहे. या पार्श्वभूमीवर आता आंतरवालीतील मंडप आणि व्यासपीठ काढल्यानंतर जरांगे या गावात आले आणि त्यांनी समाज बांधवांशी संवाद साधला आहे. आपल्या विरोधात मोठे षडयंत्र रचण्यात येत आहे. आपल्याला एकाकी पाडले जात आहे. तरीही मराठा समाजाच्या लेकरांबाळांसाठी शेवटपर्यंत हा लढा सुरुच राहिल असे मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटले आहे. आपण जीवंत असेपर्यंत आंतरवालीला डाग लागू देणार नाही असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांच्या सहकाऱ्यांनीच आरोप करणे सुरु केले आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या विरोधात मोठे षडयंत्र रचले जात आहे. आपल्याला बदनाम केले जात आहे. मात्र, आपला लढा सुरुच राहिल असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. जरांगे पाटील आज आंतरवाली सराटीत परतले आणि त्यांची येथे मंडप आणि त्याचे व्यासपीठ काढल्याने ते खीन्न झाले आणि म्हणाले की एवढा जीव तोडून सगळ्यांनी केलेले आहे, त्यामुळे तुम्ही कोणाला नाव पण ठेवू नका,सगळे आपलेच आहेत.डोक्यात अजिबात काहीही ठेवू नका लगेच काढून टाका.आपलं गाव आहे, आपल्या राज्यासाठी लढतंय,गोरगरीब लेकरांच्या आयुष्याचा कल्याण झालं तेवढेच डोक्यात ठेवा. आपल्या गावातल्या माणसाचं अजिबात डोक्यात ठेवायचं नाही कोणी असेही ते म्हणाले.

मनोज जरांगे यांनी म्हटले की, ‘आपण सगळे गाऱ्हाणं पंढरपुरात मांडतो पांडुरंगाकडे त्याचप्रमाणे लोकांच्या वेदना ऐकून घ्यायच्या आणि त्या सोडायच्या यासाठी आपलं आंतरवाली गाव आहे असेही ते म्हणाले. आंतरवाली पोहोचल्यानंतर जरांगे पाटील यांनी आपल्या समाज बांधवांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की मी जीवंत आहे तोपर्यंत आंतरवालीला डाग लागू देत नाही,आता असं झालंय की मला सुद्धा करमत नाही. आपलं असं झालं की मायलेकरासारखं घट्ट नातं झाल्यासारखं त्यामुळे ते तुटूच शकत नाही. मंडप आणि व्यासपीठ काढल्यानंतर मलाच करमेनासं झाले आहे असेही ते समाज बांधवांशी संवाद साधताना म्हणाले.

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप