मुख्यमंत्री सोलापुरात, फडणवीस बारामतीत, राज्यातील 21 नेते शेतकऱ्यांच्या बांधावर

विविध पक्षांच्या नेत्यांच्या पाहणी दौऱ्यानंतर शेतकऱ्यांना काय मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहेत. (Many Political Leader visit flood-affected districts) 

मुख्यमंत्री सोलापुरात, फडणवीस बारामतीत, राज्यातील 21 नेते शेतकऱ्यांच्या बांधावर
Follow us
| Updated on: Oct 19, 2020 | 11:45 AM

मुंबई : परतीच्या पावसामुळं झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह विविध नेतेमंडळी शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणी दौरा करणार आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांसह सर्वपक्षीय नेते शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणी करणार आहेत. या विविध पक्षांच्या नेत्यांच्या पाहणी दौऱ्यानंतर शेतकऱ्यांना काय मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहेत. (Many Political Leader visit flood-affected districts)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सोमवारी (19 ऑक्टोबर) सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरातही उपस्थित आहे. यावेळी ते सांगवी, अक्कलकोट येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधतील. सकाळी 10.15 वाजता उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील काटगाव आणि अपसिंगा येथे अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी करतील. तसेच शेती पिकांच्या नुकसानीची ते पाहणी करतील. त्यानंतर तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे पूरपरिस्थितीबाबत लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्याशी चर्चा करतील.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोलापूर दौऱ्यानंतर बुधवारी (21ऑक्टोबर) उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनसंपर्क कक्ष विभागाने मुख्यमंत्री हे बुधवारी उस्मानाबाद जिल्हा दौरा करणार असल्याची माहिती दिली. यावेळी उद्धव ठाकरे उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील काटगाव आणि अपसिंगा येथे अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी करणार आहेत. तसेच शेती पिकांच्या नुकसानीची ते पाहणी करणार आहेत.

राज्यातील अनेक नेते शेतकऱ्यांच्या बांधावर

⏺️मुख्यमंत्री उद्धव ठाकरे – सोलापूर ⏺️बाळासाहेब थोरात – सोलापूर ⏺️छगन भुजबळ- नाशिक ⏺️देवेंद्र फडणवीस – बारामती ⏺️प्रवीण दरेकर – बारामती (देवेंद्र फडणवीसांसोबत) ⏺️गोपीचंद पडळकर – बारामती (देवेंद्र फडणवीसांसोबत) ⏺️विजय वडेट्टीवार – सोलापूर ⏺️राजू शेट्टी –   बारामती ⏺️राजेश टोपे – परभणी ⏺️उदय सामंत – रत्नागिरी (खारेपाटण) ⏺️अब्दुल सत्तार – जालना ⏺️शरद पवार – उस्मानाबाद ⏺️दत्ता भरणे – पालकमंत्री (मुख्यमंत्र्यांसोबत) ⏺️दादा भुसे – कृषिमंत्री (मुख्यमंत्र्यांसोबत) ⏺️सिद्धेश्वर स्वामी, खासदार भाजप ⏺️ओमराजे निंबाळकर – खासदार शिवसेना (मुख्यमंत्र्यांसोबत) ⏺️आमदार – ज्ञानराज चौगुले, शिवसेना (मुख्यमंत्र्यांसोबत) ⏺️प्रणिती शिंदे – (मुख्यमंत्र्यांसोबत) ⏺️आमदार – कैलास पाटील, शिवसेना (मुख्यमंत्र्यांसोबत) ⏺️आमदार – राणा जगजीतसिंह पाटील, भाजप ⏺️माजी आमदार – मधुकरराव चव्हाण, काँग्रेस (मुख्यमंत्र्यांसोबत)

हेही वाचा : शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने कर्ज घ्यावं; शरद पवारांची मागणी

राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. या नुकसानाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी तुळजापूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी अतिवृष्टीमुळे उस्मानाबाद, नांदेड, लातूर, पंढरपूर, इंदापूर या भागात मोठे नुकसान झाले आहे. उस्मानाबाद हा पूर्ण जिल्हा संकटात सापडला आहे. शेतीच्या नुकसानीची मोठी किंमत महाराष्ट्राला मोजावी लागणार आहे,” अस मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं.

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. वडेट्टीवार हे आज सोलापुरातील नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यावर करणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, अक्कलकोट, मोहोळ आणि बार्शी तालुक्यातील नुकसानीची ते पाहणी करणार आहेत.

देवेंद्र फडणवीसांसह प्रवीण दरेकर नुकसान पाहणी दौऱ्यावर

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आजपासून तीन दिवसीय अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागात पाहणी दौरा करणार आहे. 19 ते 22 ऑक्टोबरदरम्यान फडणवीस पाहणी करतील. देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याला पवार कुटुंबियांचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामतीमधून सुरुवात होईल. तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आणि नुकसानीची पाहणी करण्यासाठी पुणे, सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांना फडणवीस भेट देणार आहेत.

तसेच भाजप नेते प्रवीण दरेकरही आजपासून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. प्रवीण दरेकर आजपासून चार दिवस पुणे, सोलापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या भागांचा दौरा करणार आहेत. आज पुणे, बारामती जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये प्रवीण दरेकर हे फडणवीसांसोबत उपस्थित असतील. (Many Political Leader visit flood-affected districts)

राजू शेट्टी उद्या इंदापूरसह बारामती दौऱ्यावर, तर राजेश टोपे परभणीत

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी पुणे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत. राजू शेट्टी पुणे जिल्ह्यातील इंदापूर, बारामती आणि दौंड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांना भेटी देणार आहेत. या भेटीनंतर ते कृषी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकही घेणार आहेत.

आरोग्यमंत्री राजेश टोपे आज परभणी दौऱ्यावर आहेत. ते परभणी जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करणार आहेत. त्यांनी काल अंबड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती.

शेतकरी सांगतील तसे पंचनामे करा, उदय सामंतांच्या सूचना 

रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी खारेपाटण मध्ये शेतीच्या बांधावर जाऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांनी काही शेतकऱ्यांशी संवाद साधला. पंचनामे करताना हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी झापले. पालकमंत्री यांनी अधिकाऱ्यांकडून त्यांच्या समक्ष पंचनामा करायला लावले. शेतकरी सांगतील तसे पंचनामे करण्याच्या सूचनाही उदय सामंतांनी दिल्या.

त्यांनी काल रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई येथीलही नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा सामंत यांच्याकडे मांडल्या होत्या.

महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सतार जालना दौऱ्यावर आहेत. जालना तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करणार आहेत. सकाळी 9 वाजता त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होईल.(Many Political Leader visit flood-affected districts)

संबंधित बातम्या :

अतिवृष्टी ते राजकारण; शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे

अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात, मी आलो म्हणजे लगेच मदत मिळेल असे नाही : शरद पवार

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.