AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगे पाटील यांचे अत्यंत मोठे आवाहन, अंतरवाली सराटीमध्ये दाखल होण्याच्या सूचना..

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अत्यंत मोठा इशारा दिला. जरांगे पाटील यांनी फडणवीस यांच्यासोबतच शिंदेंचे नाव घेत मोठा दावा केला. विखे हे फडणवीसांची भाषा बोलत असल्याचेही यादरम्यान त्यांनी म्हटले. जरांगे यांनी मोठे आवाहन केले.

मनोज जरांगे पाटील यांचे अत्यंत मोठे आवाहन, अंतरवाली सराटीमध्ये दाखल होण्याच्या सूचना..
Manoj Jarange Patil
| Updated on: Aug 28, 2026 | 11:05 AM
Share

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम आज संपणार आहे. उद्यापासून अंतरवाली सराटीमध्ये जरांगे यांचं शेवटचं निर्णायक आंदोलन सुरू होणार आहे. सरकारकडून पाऊले उचलली जात आहेत. या सगळ्या संदर्भात आज दिवसभरात काय काय घडामोडी घडतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांना उपोषण न करण्याची विनंती केली होती. मात्र, 58 लाख नोंदीचे कुणबी प्रमाणपत्र यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी जरांगे उद्याच्या निर्णायक आंदोलनावर ठाम आहेत. सरकारच्या शिष्टमंडळ भेटीसाठी आल्यानंतर जरांगे पाटलांनी त्यांच्यासमोर मागण्या ठेवल्या होत्या. त्या अनुषंगाने आज सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत काही संपर्क होतो का? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. यादरम्यानच मनोज जरांगे पाटील यांनी अत्यंत मोठी घोषणा केली.

घरात बसू नका, घरातून बाहेर पडत अंतरवाली सराटीमध्ये या असे मोठे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, नोंदी सापडलेल्या असून काहींना अर्ज दिले नाहीत. ज्यांनी अर्ज केले नाही त्यांनीही अंतरवालीत यावे. फडणवीस सांगतात तसं विखे पाटील बोलतात. आता वंशावळ सापडली, महसूल पुरावा नसेल तर काय करावे? नाही वावर तर आम्ही मराठे नाहीत का? काय करावं.

मेलेलं माणूस दाखवा म्हणतात. त्याचा कसा अंगठा घ्यायचा. काहीपण नवीनच काढतेत. इतक्या भिकार विचार नसावेत, इतके जास्त मराठ्यांचे वाटुळ करू नका रे.. पटापट इकडे या… इकडे पाऊस नाही, शेतातही काही पिकत नाही, इतके आपल्याला नोकऱ्याही नाहीत. पुन्हा ओरडतात आम्हाला आरक्षण नाही. मराठ्यांनी जागा व्हा, हे सरकार आपल्या लेकरांचे वाटोळे करत आहे. नोंदी सापडल्यानंतर काहींनी अर्ज केले नाहीत. लेकीबाळीचे कशाला वाटोळे करतो. यांच्या बापाकडून मी प्रमाणपत्र घेतो.

विखे यांच्याकडून आम्हाला खूप जास्त अपेक्षा होत्या. देवेंद्र फडणवीस यांचे ऐकून सर्व ऐकू नये, शिंदे यांचे ऐकून सर्व ऐकू नये, असे जरांगे यांनी म्हटले. मराठ्यांनी घरात न बसता बाहेर यावे. शिंदेंनी आणली लाडकी बहीण आणि फडणवीस यांनी आली लाडकी दीदी.. लाडकी बहीण म्हटले की, शिंदेंचे श्रेय आणि लाडकी दीदी म्हटले की फडणवीस यांचे श्रेय. पण तुमच्या या श्रेयामध्ये पोरी मरत असल्याचेही जरांगे यांनी म्हटले. मी वर्षा बंगल्यावर येऊन बसेल, असाही मोठा इशारा जरांगे पाटील यांनीदिला.

Follow Us
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?