Manoj Jarange Patil : आता हे 500 कोटीचं सांगितलं, पण यापेक्षाही तुमच्याविरोधात मोठी गोष्ट आहे माझ्याकडे, सुधरा नाहीतर..जरांगे पाटलांची शिंदेना सर्वात मोठी वॉर्निंग
Manoj Jarange Patil : मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला होता. त्यानंतर यावरुन राजकारण रंगलं होतं. मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रासमोर आणलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये या घटनेचा उल्लेख आहे.

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज देशाचं राजकारण हादरवूनस सोडणाऱ्या ऑडिओ क्लिप ऐकवल्या. त्यानंतर त्यांनी या क्लिप मधल्या संवादावर आपल्या भावना व्यक्त केल्या. “मोदी साहेब, शिंदे साहेब, ताईंनी फुल छडा लावला पाहिजे. किती मोठं भयानक षडयंत्र आहे हे . गोरगरीब मराठ्याने ऐकलं तर त्यांना समजेल की मी किती मोठ्या संकटाचा सामना करतोय. मी या समासाजासाठी मरायला सुद्धा तयार आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “दरेकरांकडून ही अपेक्षा. मराठ्यांच्या विरोधात मराठ्यांच्या पोरांना बोलायला लावायचं. दरेकरांना टीम द्या. ते बळ पुरवतील. माझ्याविरोधात खोटंनाट बोलायला लावतात. जरांगे पाटील विरोधात मराठ्यांची पोर कशी नाचवायची. मराठ्यांचे डोळे उघडले पाहिजेत. तात्पुरत्या फायद्यासाठी समाज संपेल अशी पावलं उचलू नका” असा आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं.
“कुठे राणेसाहेब म्हणाले बाळासाहेब ठाकरे आमचे बाप आहेत, बोलले असतील त्यांचा स्वाभिमान आहे. शिंदे साहेबाचा धनुष्यबाण कर्नाटकात उडवला. इथे कसा उडवतो बघा, काय नितिमत्ता तुमची. मी नाही म्हणतात तेच म्हणाताय” असं मनोज जरांगे पाटील बोलले. “अंधारे ताईंबद्दल काय वाईट शब्द बोललेत. सिंधुदुर्गात छत्रपतींचा पुतळा पडला, काय प्रेम आहे यांना छत्रपतींबद्दल बघा. महाराष्ट्राने जागं झालं पाहिजे. हे सत्य समोर आणण्यासाठी मी जिवाचं रान केलं आहे. छत्रपतींबद्दल हे प्रेम आहे. पुतळे पडल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या अंगावर शिंतोडे उडवले. याचा दुसरा अर्थ असा होतो की, तुम्ही उभा केलात तुमचे लोक त्यात आहेत पण जाळ तुमच्यावर येऊ दिला नाही. इथे उद्धव ठाकरेंवर सर्व टाकलं असा त्याचा अर्थ होतो” असं मनोज जरांगे पाटील बोलले.
पायाखालची जमीन सरकेल असं हे आहे
“आपल्याकडे काय कमी आहे पैशाची. भाजपचा फंड वापरायचा. उघडा डोळे लोकांनी. एक गरीबाचा आंदोलन करतोय म्हणून माझ्याविरोधात भाजपचा फंड वापरायचा आणि मला संपवायचं. मराठ्यांच्या पोरांना पैसे देऊन माझ्याविरोधात बोलायला लावायचं. मराठ्यांच्या मुलांनी चुकीच काम करु नये, आपली जात संकटात आहे. नोकरी, शिक्षणासाठी आपला संघर्ष सुरु आहे” असं मनोज जरांगे पाटील बोलले. “पत्रकारांनी सुद्धा जागं व्हावं. पायाखालची जमीन सरकेल असं हे आहे” असं जरांगे पाटील बोलले.
यापेक्षा तुमच्याविरोधात मोठी गोष्ट आहे माझ्याकडे
“हे सोपं नाही. शिंदे साहेब माझ्याविरोधात तु्म्ही वर्षापासून बोलताय. त्यात 70 टक्के लोक तुमचे आहेत. थांबवा हे सगळं. यापेक्षा तुमच्याविरोधात मोठी गोष्ट आहे माझ्याकडे. तुम्ही पाय सुद्धा धरणार नाही राज्यात. कुठल्या उपसमितीच्या बैठका लावता. तुमचा कोण मंत्री सांगतो हे सर्व मला माहितीय. इथून तरी पुढे सुधरा” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
ते तुमचे नाहीयत, या शब्दाचा अर्थ नीट समजून घ्या
“तुमच्यावतीने कोण-कोण बोलतय. माझ्याविरोधात बोलण्यासाठी मुंबईतल पत्रकार भवन कसं उपलब्ध होतं. कोण पुण्यात बोलतय, कोण कुठल्या जिल्ह्यात बोलतय. कोण मंत्री आहे, माझ्याविरोधात व्हॉट्स अपवर बोलतो. तुम्ही कोणाशी माझ्याविरोधात व्हॉट्स अपवर बोलता. जे लोक तुम्हाला वाटतात माझ्याविरोधात आहेत, ते माझ्या विरोधात नाहीत. हे पत्रकार परिषदेतून मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो. ते तुमचे नाहीयत. या शब्दाचा अर्थ नीट समजून घ्या” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
..तर तुम्ही पायही धरणार नाही
“तुमचा कोण नेता तिथे जातो, कोणाच्या क्लबवरुन पैसे जातात हे सर्व मला माहित आहे. हे सर्व सांगायला सुरुवात केली तर तुम्ही पाय धरणार नाही. आता हे 500 कोटीचं सांगितलं. माझ्याविरोधात बोलणारे जे 100 टक्के लोक आहेत, त्यातले 70 टक्के लोक तुम्ही चालवता. हे बंद करा. नाहीतर इथून पुढे एक-दोन महिन्यांनी मी इतका मोठा विषय बाहेर काढीन की तुम्ही पाय सुद्धा लावणार नाही” अशी वॉर्निगच शिंदेना दिली.