AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टायगर श्रॉफवरील गोळीबारावरून प्रसिद्ध गायक संतापला; मुंबईच्या सुरक्षिततेवरून खूप काही बोलून गेला

टायगर श्रॉफवरील गोळीबारावरून प्रसिद्ध गायकाने संताप व्यक्त केला आहे. त्याने मुंबईच्या सुरक्षिततेवरून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

टायगर श्रॉफवरील गोळीबारावरून प्रसिद्ध गायक संतापला; मुंबईच्या सुरक्षिततेवरून खूप काही बोलून गेला
tiger shroffImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 19, 2026 | 1:27 PM
Share

टायगर श्रॉफवर गोळीबारानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. टायगर श्रॉफवर भर रस्त्यात गोळीबार झाल्यानंतर उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अनेक कलाकार मुंबईच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करत आहेत. तर अनेक जण मुंबईच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करत आहेत. प्रसिद्ध गायक मिका सिंगने देखील मुंबईच्या सुरक्षेवर बोट ठेवलं आहे. मुंबई 20 वर्षांपूर्वी हे जगात सुरक्षित मानले जात होते. परंतु आता परिस्थिती नाही, असे गायक मिका सिंगने म्हटलं आहे.

मिका सिंगने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे. मिका सिंगने टायगर श्रॉफच्या आरोग्याची प्रार्थना केली आहे. त्याने म्हटलं की, तुम्हा सर्वांना माहीत आहे की टायगर  श्रॉफवर गोळीबार झाला आहे. टायगर नशिबाने वाचला आहे. आम्ही देवाला प्रार्थना करतो की, तो सुरक्षित आणि निरोगी राहावा’. त्याने पुढे सांगितलं की, 2005 सालची मुंबई आणि आताच्या मुंबईत बदल झाला आहे. मी छोटीशी स्टोरी सांगतो. मी 2005 साली मुंबईत आलो होतो. मी दिल्ली, पंजाबचा प्रवास करून मुंबईत आलो होतो. मी जगात सर्वात सुरक्षित शहर मुंबई असल्याचे सांगत फिरायचो. मुंबईतील लोक चांगले आहेत’.  आताची परिस्थिती पाहून हे केवळ सांगण्यासाठी उदाहरण राहील, असे सांगितले. चिंता व्यक्त करत मिकाने सांगितले की, ‘टायगर श्रॉफसोबत जे झालं आहे, ते उत्सवाच्या काळात झालं आहे. गरबा, दांडिया सुरू आहेत. यादरम्यान इतकी मोठी घटना घडली. मी सरकारला हात जोडून विनंती करत आहे की, या मुद्दयावर कठोर कारवाई करावी. आज टायगरसोबत झालं, उद्या कोणासोबतही होऊ शकतं’.

गोळीबार करणाऱ्या तिन्ही आरोपींना अटक 

तत्पूर्वी, मुंबईच्या जुहू परिसरात 18 ऑक्टोबर रोजी टायगर श्रॉफवर गोळीबार झाला. या घटनेनंतर टायगर सुरक्षित आणि सुखरूप आहे. परंतु त्याच्या ड्रायव्हरसहित एक जण जखमी झाला. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. बिश्नोई गँगने सोशल मीडियावर पोस्ट आणि ऑडिओ क्लिप करत जबाबदारी घेतली आहे. या घटनेनंतर सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  टायगरवर गोळीबार करणाऱ्या तिघांना राजस्थान पोलिसांनी अटक केली आहे. त्यातील एक जण अल्पवयीन असल्याची माहिती मिळत आहे.

Follow Us
राहुल बोंद्रे यांच्या अडचणी वाढल्या! शैक्षणिक संस्थांच्या चौकशीसाठी...
राहुल बोंद्रे यांच्या अडचणी वाढल्या! शैक्षणिक संस्थांच्या चौकशीसाठी पोलिसांची नोटीस
पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडेंचे विरोधकांना खुले आव्हान;
पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडेंचे विरोधकांना खुले आव्हान; म्हणाले...
वाशिममध्ये दुष्काळाचा कहर! पाण्याअभावी हळदीचे पीक वाळले, शेतकरी...
वाशिममध्ये दुष्काळाचा कहर! पाण्याअभावी हळदीचे पीक वाळले, शेतकरी हतबल
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मतमोजणीला सुरुवात, महायुतीची आघाडी
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मतमोजणीला सुरुवात, महायुतीची आघाडी
शिंदे टायगर श्रॉफला भेटले, मग पुर्णेकर कुटुंबाला का नाही भेटले?- राऊत
Sanjay Raut: शिंदे टायगर श्रॉफला भेटले, मग पुर्णेकर कुटुंबाला का नाही भेटले?
टायगर श्रॉफ प्रकरणी CM फडणवीसांचा आक्रमक पवित्रा! मुंबई पोलीस ॲक्शन...
टायगर श्रॉफ प्रकरणी CM फडणवीसांचा आक्रमक पवित्रा! मुंबई पोलीस ॲक्शन मोडमध्ये
मुंबई गोळीबाराच्या अगदी तासाभरापूर्वी टायगर श्रॉफ चाहत्यांना भेटला;
मुंबई गोळीबाराच्या अगदी तासाभरापूर्वी टायगर श्रॉफ चाहत्यांना भेटला होता; व्हिडीओ व्हायरल, हल्लेखोर त्याच परिसरात होते?
गोकुळ दुध संघाच्या निवडणुकीचा आज फैसला! सतेज पाटील की हसन मुश्रीफ...
गोकुळ दुध संघाच्या निवडणुकीचा आज फैसला! सतेज पाटील की हसन मुश्रीफ, कोण मारणार बाजी?
टायगर श्रॉफच्या भेटीसाठी वेळ, पण प्रदीप पूर्णेकरांच्या घरी जाण्यासाठी
टायगर श्रॉफच्या भेटीसाठी वेळ, पण प्रदीप पूर्णेकरांच्या घरी जाण्यासाठी नाही? राम पूर्णेकरांचा एकनाथ शिंदेंवर संताप
दुष्काळात मेंढपाळांनाही मदत द्या; पडळकरांची मागणी, धनगर आरक्षणावर...
दुष्काळात मेंढपाळांनाही मदत द्या; पडळकरांची मागणी, धनगर आरक्षणावर मोठं विधान!