Mika Singh | सांगली-कोल्हापूरमध्ये 50 घरं बांधून देणार : गायक मिका सिंग

वादामुळे नेहमीच चर्चेत असलेला गायक मिका सिंगने (Mika Singh) सांगली आणि कोल्हापूरमधील पूरग्रस्तांसाठी 50 घरं बांधून देण्याची घोषणा केली आहे.

Mika Singh | सांगली-कोल्हापूरमध्ये 50 घरं बांधून देणार : गायक मिका सिंग

मुंबई : वादामुळे नेहमीच चर्चेत असलेला गायक मिका सिंगने (Mika Singh) सांगली आणि कोल्हापूरमधील पूरग्रस्तांसाठी 50 घरं बांधून देण्याची घोषणा केली आहे. नुकतंच मिकाने पाकिस्तानमध्ये परफॉर्मन्स केला म्हणून सिनेवकर्स इंडियन असोसिएशननं त्याच्याव बंदी घातली आहे. याप्रकरणामुळे वादात असलेल्या मिकाने आता  जय हिंद, जय महाराष्ट्र म्हणत पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला.

मिका म्हणाला, “ महाराष्ट्रात पुरामुळे अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत. अनेकांचा मृत्यू झाला आहे. मोठं नुकसान झालं आहे. लोक अडचणीत आहेत. महाराष्ट्र सरकार काम करत आहे, जवान काम करत आहेत. मराठी सिनेसृष्टीशी संबंधित एनजीओ चांगलं काम करत आहे. माझं पूरग्रस्त मराठी बांधवांना आश्वासन आहे की मी माझ्यातर्फे पूरग्रस्त भागात 50 घरं बांधून देईन”

मिकाने पूरग्रस्त भागात घरं बांधण्याचं आश्वासन देतानाच, देशभरातील जनतेला मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन केलं.

“संपूर्ण देश या मदतीसाठी एकत्र यावा. विशेषत: माझ्या बॉलिवूडमधील मित्रांनी पुढे येऊन मदतीचा हात दिला, तर मी 50 घरं बांधणार आहे, त्याची संख्या आपल्यामुळे हजारांवर पोहचू शकते. संपूर्ण देशाने मदत केली तर हजारो घरं बांधून होतील…जय महाराष्ट्र, जय हिंद”, असं मिका म्हणाला.

पाकिस्तानातील परफॉर्ममुळे वाद

मिका सिंहने गेल्या 8 ऑगस्ट 2019 रोजी कराचीमध्ये एका कार्यक्रमात परफॉर्म केलं. हा कार्यक्रम पाकिस्तानचे  माजी अध्यक्ष परवेज मुशर्रफच्या (Pervez Musharraf) जवळच्या नातेवाईकांसाठी आयोजित करण्यात आला होता. एकीकडे जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविल्याने भारताच्या विरोधात पाकिस्तान आगपाखड करत आहे. पाकने भारताशी सर्व संबंध तोडले आहेत. असं असूनही मिकाने देशाच्या सन्मानापेक्षा पैशाला जास्त महत्त्व दिलं. म्हणून त्याच्यावर ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA)  बंदी घातली आहे.

संबंधित बातम्या 

पाकमधील कार्यक्रम भोवला, गायक मिका सिंहशी बॉलिवूडने सर्व संबंध तोडले 

अभिनेत्री नेहा पेंडसेचा साखरपुडा?

शाहरुख आणि सलमानलाही मागे टाकलं, गुगल सर्चमध्ये सनी लिओनी अव्वल

बिचुकले, तुम्ही ‘हिंदी बिग बॉस’मध्ये या, सलमान खानचं आमंत्रण

दिशा पटानी को ‘पटाना’ औकात के बाहर : टायगर श्रॉफ

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *