पाकमधील कार्यक्रम भोवला, गायक मिका सिंहशी बॉलिवूडने सर्व संबंध तोडले

बॉलिवूड गायक मिका सिंह सध्या त्याच्या एका कार्यक्रमुळे अडचणीत सापडला आहे. भारत-पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती असताना मिकाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ मिकाच्या पाकिस्तानामधील एका कार्यक्रमाचा होता.

पाकमधील कार्यक्रम भोवला, गायक मिका सिंहशी बॉलिवूडने सर्व संबंध तोडले

मुंबई : बॉलिवूड गायक मिका सिंह सध्या त्याच्या एका कार्यक्रमुळे अडचणीत सापडला आहे. भारत-पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती असताना मिकाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ मिकाच्या पाकिस्तानामधील एका कार्यक्रमाचा होता. सध्या त्याच्या या व्हिडीओचा मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. याच व्हिडीओमुळे ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने मिका सिंहवर बंदी घातली आहे. ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी अधिकृतरित्या हे जाहीर केलं.

“मिकाचं फिल्म प्रोडक्शन हाऊस, म्युझिक कंपनी आणि ऑनलाईन कंटेंट प्रोव्हायडरसोबत त्याच्या सर्व करारांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय असोसिएशन ने मिकाच्या सर्व सिनेमांवर, गाण्यांवर आणि एन्टरटेनमेंट कंपन्यांसोबत काम करण्यावरही बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे”, अशी माहिती सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी दिली.

“मिका इंडस्ट्रीमध्ये कुणाहीसोबत काम करणार नाही, यावर ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) नजर ठेवेल. जर कुणी त्याच्यासोबत काम केलं तर त्याच्याविरोधातही न्यायालयीन कारवाई केली जाईल”, असा इशाराही गुप्ता यांनी दिला.

“दोन देशांमध्ये तणाव वाढत असताना मिकाने देशाच्या सन्मानापेक्षा पैशाला जास्त महत्त्व दिलं”, असा आरोप मिकावर करण्यात आला आहे.

मिकाला विरोध का?

मिका सिंहने गेल्या 8 ऑगस्ट 2019 रोजी कराचीमध्ये एका कार्यक्रमात परफॉर्म केलं. हा कार्यक्रम पाकिस्तानी हुकुमशाह परवेज मुशर्रफच्या जवळच्या नातेवाईकासाठी आयोजित करण्यात आला होता. एकीकडे जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविल्याने भारताच्या विरोधात पाकिस्तान आगपाखड करत आहे. पाकने भारताशी सर्व संबंध तोडले आहेत. असं असूनही मिकाने देशाच्या सन्मानापेक्षा पैशाला जास्त महत्त्व दिलं. म्हणून त्याच्यावर ही बंदी लावण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

अभिनेत्री नेहा पेंडसेचा साखरपुडा?

शाहरुख आणि सलमानलाही मागे टाकलं, गुगल सर्चमध्ये सनी लिओनी अव्वल

बिचुकले, तुम्ही ‘हिंदी बिग बॉस’मध्ये या, सलमान खानचं आमंत्रण

दिशा पटानी को ‘पटाना’ औकात के बाहर : टायगर श्रॉफ

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *