AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हम कबड्डी के खिलाडी है, शतरंज के नही… छगन भुजबळ यांचं सूचक विधान, म्हणाले, सुनेत्रा पवार मंत्री, त्यांचा मुलगाही…

राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी छगन भुजबळ इच्छुक होते. यादरम्यान छगन भुजबळच राज्यसभेवर जाण्याची चर्चा असतानाच थेट धक्का देत राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर देवगिरी बंगल्याहून कोणतीही प्रतिक्रिया न देता भुजबळ निघून गेले. आता भुजबळांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

हम कबड्डी के खिलाडी है, शतरंज के नही... छगन भुजबळ यांचं सूचक विधान, म्हणाले, सुनेत्रा पवार मंत्री, त्यांचा मुलगाही...
Chhagan Bhujbal
| Updated on: Jun 08, 2026 | 11:35 AM
Share

राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ इच्छुक होते. मात्र, राज्यसभेवर जाण्याकरिता त्यांनी मोठी अट ठेवली होती. भुजबळांनी स्वत:चे मंत्रिपद समीर भुजबळ यांना देण्याबाबत भाष्य केले होते. याकरिता दिल्ली भाजपाने रेड सिग्नल दिला. छगन भुजबळ यांना मोठा धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून थेट राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर छगन भुजबळ नाराज असल्याचे सांगितले जाते. यादरम्यानच आता यावर पहिली प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. छगन भुजबळ यांनी म्हटले की, मला राज्यसभा आणि लोकसभेला जायचं होतं. चार पाच वेळा संधी आली. दुर्देवाने संधी मिळाली नाही. यावेळी जायचं आहे. मकरंद पाटील मंत्री आहेत. त्यांचे भाऊ खासदार आहे. सुनेत्रा पवार मंत्री, पुत्र खासदार, तटकरे खासदार पुत्र आमदार. मलाही हा नियम लागू करण्याची विनंती केली.

वर कम्युनिकेट करायला वेळ लागला असावा. भाजपकडे प्रपोजल गेलं. जेव्हा मंत्रिमंडळाचं विस्तारीकरण होईल तेव्हा विचार करू. असं कळलं. त्यामुळे भाजपने नकार दिला यात तथ्य नाही. नाराज नाही. इतरांना जो न्याय दिला. ते मंत्री आहेत, खासदार आहेत. त्यांची मुलंबाळं आमदार आहेत. तोच न्याय मला लावावा असं म्हटलं होतं. अन्याय काय आहे…

चालायचंच. आज नाही तर कल, कल नही तो कल… मी कबड्डीचा खेळाडू आहे. बुद्धीबळाचा नाही. बुद्धीबळ मला जमत नाही. अरे हमने कहां ना हम कबड्डी के प्लेअर है, शतरंज के खिलाडी नही है..  जैन यांच्या अर्जावर बोलताना भुजबळांनी म्हटले की, 20 दिवसांपासून ठरलेले. ⁠मला राज्यसभा की लोकसभा विचार सुरू होता. ⁠मी राज्यसभेवर जातो असे बोललो होतो.

मंत्रिमंडळाच विस्तारीकरण होईल. ⁠मलाही न्याय मिळाला पाहिजे. ⁠सर्व एकत्रित येण्यासाठी पटेल बंगल्यावर आलेले होते, असेही भुजबळांनी म्हटले. आज राजेंद्र जैन यांनी अर्ज भरला आहे. यावेळी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ हे उपस्थित होते. छगन भुजबळ यांना बघताच वाकून नमस्कार करताना राजेंद्र जैन हे दिसले.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात