AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्री महाजन यांनी आपला वर्षभराचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीस दिला,अशी मदत करणारे पहिलेच मंत्री

भाजपाचे संकटमोचक आणि राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांचे वर्षभराचे वेतन रूपये ३१ लक्ष मुख्यमंत्री सहायता निधीस ! आपला वर्षभराचा पगार देणारे राज्यातील पहिलेच मंत्री ठरले आहेत.

मंत्री महाजन यांनी आपला वर्षभराचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीस दिला,अशी मदत करणारे पहिलेच मंत्री
girish mahajan and devendra fadnavis
| Updated on: Oct 07, 2025 | 9:31 PM
Share

राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आपले वर्षभराचे वेतन ( रक्कम रुपये ३१ लक्ष १८ हजार २८६ ) मुख्यमंत्री सहायता निधीस दिले आहेत.त्याबाबतचा धनादेश आणि संमतीपत्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज रोजी मंत्रीमंडळाच्या बैठकी दरम्यान सादर केले. अशा प्रकारे संपूर्ण वर्षभराचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस देणारे ते पहिलेच मंत्री ठरले आहेत.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मंत्री पदाचा वर्षभराभरातील वेतन रक्कम रुपये ३१, १८,२८६ मुख्यमंत्री सहायता निधीस दिले आहेत. त्याबाबतचे धनादेश आणि संमतीपत्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज रोजी मंत्रीमंडळाच्या बैठकी प्रसंगी सादर केले.

राज्यात मुसळधार पावसामुळे शेतीचे झालेले नुकसान तसेच राज्यातील विविध भागात महापुरामुळे झालेले नुकसान यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून नागरिकांना मदत करण्यात येत आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी राज्यातील अनेक जिल्ह्यांना भेट देऊन झालेल्या नुकसानीचे तसेच पाहणी केली आहे. मराठवाड्यातील जालना,बीड छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, सोलापूर तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव नाशिक, या जिल्ह्यांमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी भेटी घेऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे.

संकटकाळात नागरिकांच्या मदतीला धावून जाणारे संकटमोचक म्हणून मंत्री गिरीश महाजन मदत करण्यात देखील संकटमोचक ठरले आहे. आपला वर्षभराचा पगार देणारे ते राज्यातील पहिलेच मंत्री ठरले आहे. सद्याच्या मंत्री पदाची शपथ घेतल्या पासून डिंसेबर 2024 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीचे संपूर्ण वेतन रु. ३१ , १८ , २८६ त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिले आहे. पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधीत नागरिकांना “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” मार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते. अनेक सेवाभावी संस्था संस्था यांनी मुख्यमंत्री सहायता निधी दिले आहेत त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी देखील मानधन दिले आहे.

शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर

राज्यात मुसळधार पाऊस , तसेच महापुरामुळे प्रचंड नुकसान झालेले आहे. अनेक ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केलेली आहे. राज्याच्या जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर आहे, राज्य सरकारकडून त्यांना योग्य ती मदत मिळत असताना आपला देखील त्यामध्ये सहभाग असावा म्हणून माझ्या सध्याच्या मंत्री पदाच्या वर्षे भराचे एकूण पगार रु. ३१ लक्ष १८ हजार २८६ मुख्यमंत्री सहायता निधीस देत आहे असे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

Follow Us
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा
परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? बापटांचा सवाल
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? विद्यानंद बापटांचा धंगेकरांना थेट सवाल
जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा..
Satej Patil on Manoj Jarange Protest | जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा थेट इशारा; मराठा आरक्षणावरून सरकारवर घणाघात
पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर-बापट यांच्यात खडाजंगी
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर- विद्यानंद बापट यांच्यात खडाजंगी,  व्हिडीओ बघाच
ओबीसी आरक्षण संपता कामा नये! छगन भुजबळांचा महायुतीला घरचा आहेर; मराठा
Chhagan Bhujbal | ओबीसी आरक्षण संपता कामा नये! छगन भुजबळांचा महायुतीला घरचा आहेर; मराठा आरक्षणावरून सरकारला थेट सवाल
हृदयद्रावक घटना! राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी तीन मुलांसह...
Dharashiv | नळदुर्ग किल्ल्यावर हृदयद्रावक घटना! राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी तीन मुलांसह जीवन संपवलं; चौघांवर गुन्हा
बीडमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद
Uddhav Thackeray | बीडमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद; प्रत्येकासाठी 10 लाखांची पॉलिसी जाहीर
पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल ठाकरेंचा इशारा
Uddhav Thackeray | पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल! उद्धव ठाकरेंचा सज्जड इशारा
विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले!
Sanjay Gaikwad | विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले! संजय गायकवाडांविरोधात आरती आंबींची पोलिसांत तक्रार दाखल