ना शाळा, ना भिंती! सामाजिक न्याय विभागाचे शिक्षक देताहेत पालावर जाऊन ज्ञानाचे धडे

पालावर राहणाऱ्या, वीट भट्टीवर काम करणाऱ्या, भिक्षा मागणाऱ्या पालकांच्या मुलांसाठी 'मिशन डायरेक्ट ऍडमिशन' ही संकल्पना राबवून, यांतर्गत हजारो मुलांना समाज कल्याण विभागाच्या आश्रम शाळांमध्ये मोफत प्रवेश दिले आहेत.

ना शाळा, ना भिंती! सामाजिक न्याय विभागाचे शिक्षक देताहेत पालावर जाऊन ज्ञानाचे धडे
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतील मिशन डायरेक्ट अॅडमिशन योजना

बीड : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि बीड पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून बीड जिल्हा सामाजिक न्याय विभागाकडून एक अत्यंत स्तुत्य उपक्रम राबला जात आहे. पालावर राहणाऱ्या, वीट भट्टीवर काम करणाऱ्या, भिक्षा मागणाऱ्या पालकांच्या मुलांसाठी ‘मिशन डायरेक्ट ऍडमिशन’ ही संकल्पना राबवून, यांतर्गत हजारो मुलांना समाज कल्याण विभागाच्या आश्रम शाळांमध्ये मोफत प्रवेश दिले आहेत. सध्या ऑनलाईन शिक्षणाची या मुलांकडे सोय होऊ शकत नाही. त्यामुळे सामाजिक न्याय विभागाच्या शाळेतील शिक्षक थेट या पालांवर जाऊन या बालकांना शालेय शिक्षण देत आहेत. (Mission Direct Admission Initiative conceived by Minister Dhananjay Munde)

पाल, वीट भट्टी, आदी ठिकाणी जाऊन कोणत्याही भिंती, शाळा हे बंधन तोडून ही मुले जागा मिळेल तिथे, अगदी मंदिरात, खुल्या मैदानात शिक्षण घेत आहेत. धनंजय मुंडे यांनी या उपक्रमात सहभागी झालेल्या सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांच्यासह सर्व शिक्षकांचे कौतुक करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आश्रम शाळेतील शिक्षक या पाल-वस्त्यांवर देताहेत विद्यार्थ्यांना धडे

मागील महिन्यात समाज कल्याण विभागाने मिशन डायरेक्ट ऍडमिशन राबवून समाज कल्याण विभागाच्या आश्रम शाळांमध्ये हजारो मुलांचे पाल-वस्त्यांवर जाऊन प्रवेश करुन घेतले, परंतु सध्या शाळा बंद आहेत. तर दुसरीकडे या मुलांसाठी ऑनलाईन शिक्षणाची सोय करणेही जिकिरीचे आहे. याचाच विचार करून धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेचा विस्तार करत आश्रम शाळेतील शिक्षक या पाल-वस्त्यांवर जाऊन बालकांना शिक्षण देत आहेत. सामाजिक न्याय विभागाच्या आश्रम शाळा सुरू होईपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे. तसंच जिल्ह्यात आणखी अशी मुले कुठेही शिक्षणापासून वंचित असतील तर बीड जिल्हा सामाजिक न्याय भवन इथं संपर्क करून माहिती द्यावी. त्यांच्यापर्यंत पोचण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू, अशी माहिती सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी दिली आहे.

5 हजार 300 मुलांना प्रवेश

मिशन डायरेक्ट ऍडमिशन अभियानातून सुमारे 5 हजार 300 मुलांना प्रवेश देण्यात आले आहे. यापैकी 3 हजार मुलांना पाल-वस्त्यांवर जाऊन शिक्षण देणं सुरू झालं आहे. उर्वरित विद्यार्थ्यांपर्यंत पोहचून त्यांनाही शिक्षण प्रवाहात सामील करण्यात येत आहे, अशल्याचीही माहिती विभागाकडून देण्यात आलीय.

इतर बातम्या :

बुके घेईन तर शिवेंद्रराजेंकडूनच…, ‘करेक्ट कार्यक्रमा’साठी प्रसिद्ध असलेल्या जयंत पाटलांच्या मनात काय?

मालकाच्या मुलीवर कामगाराचा जीव जडला, मालक चिडला, दुहेरी हत्याकांडाने चाकण हादरलं

Mission Direct Admission Initiative conceived by Minister Dhananjay Munde

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI