मालकाच्या मुलीवर कामगाराचा जीव जडला, मालक चिडला, दुहेरी हत्याकांडाने चाकण हादरलं

चाकणमधील (Chakan) करंजविहिरे गावात (Karanjvihire) दुहेरी हत्याकांड  (Double murder Pune) झाल्याची घटना समोर आली आहे. ही हत्या प्रेमप्रकरणातून झाल्याचं सांगण्यात येत आहे.

मालकाच्या मुलीवर कामगाराचा जीव जडला, मालक चिडला, दुहेरी हत्याकांडाने चाकण हादरलं
Chakan Police station

पुणे : चाकणमधील (Chakan) करंजविहिरे गावात (Karanjvihire) दुहेरी हत्याकांड  (Double murder Pune) झाल्याची घटना समोर आली आहे. ही हत्या प्रेमप्रकरणातून झाल्याचं सांगण्यात येत आहे. प्रियकर आणि त्याच्या मित्राला लाकडी दांडके, लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली. यातच दोघांचा मृत्यू झाला. तसेच या मारहाणीत प्रेयसीही जखमी आहे.

याप्रकरणी मुलीच्या वडिलांसह एकूण 6 जणांना चाकण पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मयत, बाळू सीताराम गावडे आणि त्याचा मित्र राहुल गावडे हे दोघे वीटभट्टीवर कामाला होते. बाळू आणि वीटभट्टी मालकाची मुलगी 14 तारखेला पळून गेले होते. यासाठी राहुल गावडेने मदत केली होती. यावरुन मुलीच्या वडिलाने बाळू आणि राहुल या दोघांना त्यांच्या हॉटेलवर आणून बेदम मारहाण केली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

नेमकं प्रकरण काय?

बाळू गावडे (26) आणि राहुल गावडे (28) हे दोघे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आसखेड गावचे रहिवासी होते. दोघेही चाकणजवळच्या करंजविहिरे गावात एका वीटभट्टीवर कामाला होते. या वीटभट्टी मालकाचं हॉटेलही आहे. या वीटभट्टी मालकाला 21 वर्षांची मुलगी आहे. बाळू आणि या मुलीचं प्रेमप्रकरण जुळलं होतं. या प्रेमप्रकरणाला साहजिकच मुलीच्या घरातून विरोध होता. त्यामुळे दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला.

या दोघांना राहुल गावडेने मदत केली होती. राहुलच्या मदतीने बाळू आणि वीटभट्टी मालकाची मुलगी पळू गेली. या सर्वप्रकाराने वीटभट्टी मालक प्रचंड संतापला होता. त्याने राहुल आणि बाळू यांना शोधून काढले. बाळूसोबत मालकाची मुलगीही होती. त्यांनी राहुल आणि बाळू यांना त्यांच्या हॉटेलवर आणून बेदम मारहाण केली. लाकडी दांडके, लोखंडी रॉडने मारहाण केल्यामुळे या दोघांचाही मृत्यू झाला. यावेळी मुलीलाही मारहाण झाली आहे. तिलाही दुखापत झाल्याने ती जखमी आहे.

पोलिसांनी मुलीच्या वडिलांसह एकूण 6 जणांना ताब्यात घेतलं आहे. पुढील तपास चाकण पोलीस करत आहेत.

संबंधित बातम्या  

पुरंदरमध्ये मुळशी पॅटर्न, कुख्यात गुंड गणेश रासकरची हत्या

भिवंडीत अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने चिमुरड्याची अपहरण करून हत्या

दुहेरी हत्याकांडाने चंद्रपूर जिल्हा हादरला; भांडणातून सुनेची केली हत्या, मग पत्नीला संपवले!

(Double murder from a love affair in Chakans Karanjvihire village pune crime police arrested six accused)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI