दुहेरी हत्याकांडाने चंद्रपूर जिल्हा हादरला; भांडणातून सुनेची केली हत्या, मग पत्नीला संपवले!

किरकोळ वादातून दोन महिलांचे प्राण गेले. रागाच्या भरात घडलेल्या या धक्कादायक घटनेने परिसर, जिल्ह्यातील नागरिकांसह पोलिसही सुन्न झाले आहेत.

दुहेरी हत्याकांडाने चंद्रपूर जिल्हा हादरला; भांडणातून सुनेची केली हत्या, मग पत्नीला संपवले!
दुहेरी हत्याकांडाने चंद्रपूर जिल्हा हादरला; भांडणातून सुनेची केली हत्या, मग पत्नीला संपवले!
Follow us
| Updated on: Jul 16, 2021 | 9:12 PM

चंद्रपूर : बल्लारपूर शहरात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण चंद्रपूर जिल्हा हादरून गेला आहे. कर्करोगाने त्रस्त असलेल्या पत्नीची काळजी घेण्यावरून सुनेशी भांडण झाले. त्या भांडणातून आरोपीने आधी सुनेची हत्या केली. नंतर आपण तुरुंगात गेल्यावर पत्नीची काळजी कोण घेणार, या चिंतेतून तिलाही संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्याकांडानंतर आरोपी स्वतःहून बल्लारपूर पोलीस ठाण्यात शरण आला. (double murder in chandrapur, father in law killed his daughter in law and wife)

आजारी पत्नीची काळजी घेण्यात सुनेने हयगय केल्याचा राग

शहरातील शिवाजी वार्डात राहणाऱ्या काजल डे (वय 58) यांची पत्नी आशा ही कर्करोगाने पीडित होती. दीर्घकाळ रूग्णालयात राहिल्यानंतर ती नुकतीच घरी परतली होती. डायलिसिसवर असलेल्या पत्नीची सून प्रियंका ही व्यवस्थित देखभाल करत नसल्याने घरात अधूनमधून वाद होत होते. घटना घडली त्या दिवशी आरोपी काजल आपले काम आटोपून घरी आला होता. त्यावेळी त्याने आजारी पत्नीला जेवण दिले का? अशी विचारणा सुनेला केली. त्यावर “वेळ मिळेल तेव्हा देईन” असे उत्तर सुनेने दिले. त्यावरून आरोपी आणि त्याच्या सुनेमध्ये भांडणाला सुरुवात झाली. हे भांडण विकोपाला गेल्यानंतर आरोपी काजल याने सुन प्रियंका हिचा गळा आवळून खून केला.

पत्नीच्या काळजीपोटी तिचीही हत्या

या गुन्ह्यासाठी आपल्याला शिक्षा होणार हे लक्षात आल्यानंतर आरोपी काजल याला आजारी पत्नीची काळजी वाटू लागली. आपण तुरुंगात गेल्यावर आपल्या पश्चात आजारी पत्नीची देखभाल कशी होणार, ही चिंता सतावल्यानंतर त्याने मरणासन्न अवस्थेतील पत्नीचाही गळा आवळून खून केला. नंतर त्याच स्थितीत काजल डे याने बल्लारपूर पोलीस स्टेशन गाठले व आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी गाठत दोघींनाही रुग्णालयात नेले. मात्र पत्नीचा आधीच मृत्यू झाला होता तर रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही तासांनी सुनेचाही मृत्यू झाला. अशा रीतीने ‘जेवण देण्याच्या वादावरून’ दोघांचे जीव गेले. बल्लारपूर पोलीस ठाण्यात काजल डे यांच्या मुलाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी काजल डे याला अटक करून बल्लारपूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

किरकोळ वादातून घडलेल्या गुन्ह्याने पोलिसही सुन्न

किरकोळ वादातून दोन महिलांचे प्राण गेले. रागाच्या भरात घडलेल्या या धक्कादायक घटनेने परिसर, जिल्ह्यातील नागरिकांसह पोलिसही सुन्न झाले आहेत. आरोपीने आजारी पत्नीला तिच्या देखभालीच्या काळजीतून संपवल्याचे उघडकीस आल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. (double murder in chandrapur, father in law killed his daughter in law and wife)

इतर बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या किमतीत घसरण; उच्च स्तरापासून अजूनही 7,945 रुपयांनी स्वस्त, पटापट तपासा

31 ऑगस्टपर्यंत स्वस्त बाईक खरेदी करण्याची संधी, केटीएम 250 अ‍ॅडव्हेंचरच्या किंमतीत 25000 रुपये कपात

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.