वाशिममध्ये रस्त्यांची दुरावस्था, भाजप आमदारांच्या नेतृत्वात जागरण गोंधळ आंदोलन

रस्त्याची दुरुस्ती करण्यात न आल्याने संतप्त झालेल्या आमदार लखन मलिक यांच्या नैतृत्वात भारतीय जनता पार्टीच्या वतीने खड्ड्यात उतरून आरती करीत जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलं.

वाशिममध्ये रस्त्यांची दुरावस्था, भाजप आमदारांच्या नेतृत्वात जागरण गोंधळ आंदोलन
भाजप आमदार लखन मलिक यांचं आंदोलन
Follow us
| Updated on: Jul 16, 2021 | 8:07 PM

वाशिम:  शहरातील सर्वच मुख्य  रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या खड्डयांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने रस्त्यावरून पायी चालणं कठीण झालं आहे. या खड्ड्यामुळे अपघात होऊन अनेकांना अपंगत्व आले आहे.हा रस्ता दुरुस्त व्हावा यासाठी स्थानिक आमदार लखन मलिक यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. मात्र, नगर परिषद प्रशासन याकडे लक्ष देत नसून, अद्याप ही रस्त्याची दुरुस्ती करण्यात न आल्याने संतप्त झालेल्या आमदार लखन मलिक यांच्या नैतृत्वात भारतीय जनता पार्टीच्या वतीने खड्ड्यात उतरून आरती करीत जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलं.स्थानिक शिवाजी चौकात झालेल्या या आंदोलनात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. शहरातील रस्त्याची वेळीच दुरुस्ती केली नाही तर यापुढे रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे यावेळी आमदार लखन मलिक यांनी सांगितले

अपघातांचं प्रमाण वाढलं

वाशिम शहरात चौकाचौकात गल्लीगल्लीत पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक लोकांचे अपघात होऊन हात पाय फॅक्चर होण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचणे या शहरात अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडून बरेच जण त्या खड्ड्यांमध्ये पडले फॅक्चर झाले. वेळोवेळी नगरपरिषदेला सूचना देऊन सुद्धा नगरपालिकेने याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे आज नगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी नगर परिषदेचे सीईओ दीपक मोरे तसेच अभियंता घोगरे यांना वाशिम शहरात घुमवून शहरातील सर्व खड्डे निदर्शनास आणून देण्यात आलं.

भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित

वाशिम नगरपालिकेच्या विरोधात वाशिम मतदारसंघाचे आमदार लखन मलिक तसेच भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष धनंजय हेंद्रे नगर परिषद सदस्य अमित मानकर नगर परिषद सदस्य भीमकुमार जीव नानी शहर उपाध्यक्ष रामभाऊ ठेंगडे यांच्या नेतृत्वात वाशिम शहरात पडलेल्या खड्ड्यांचे पूजन आंदोलन करण्यात आले. या कार्यक्रमाला जि प सदस्य दिगंबर खोरणे, शहर सरचिटणीस गणेश खंडाळकर, अध्यात्मिक समन्वय आघाडी चे जिल्हाध्यक्ष शिवशंकर भोयर, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सदस्य प्रदीप देशमूख, सुनील तापडिया, जीवन अग्रवाल, कैलास मुगंकर, विश्वास ब्रह्मेकर, गणेश पाठक, नीलेश जैस्वाल, पवन जोगदंड, योगेश सराफ, गजानन जाधव, रामेश्वर पाटील महाले, राजू दिग्रस्कर, रवी पेंढारकर, तालुका सरचिटणीस दत्ता सुरदुसे, शंकर शेंडे, नितीन पेंढारकर, गणेश गायकवाड, नाना दिग्रस्कर, शंकर पाटील खंदारे, मदन सावके, संतोष तोंडे, रितेश मलिक, रमेश नकले, रामभाऊ देव, शुभम आढाव, रामभाऊ इंगळे, विनोद मगर, नारायण वानखेडे, शेषराव धोंगडे, भागवत शिंदे, शाहीर पवार, मीनाताई नकले, उषाबाई कांबळे, रत्‍नाबाई कांबळे, सविता नकले, यासह शहरातील भारतीय जनता पार्टीचे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते

इतर बातम्या:

SSC website crash : 16 लाख विद्यार्थी 6 तासांपासून ताटकळत, बोर्ड म्हणतं अजून थोडी वाट पाहा!

IND vs ENG : ऋषभ पंतला कोरोना, संघाला नव्या यष्टीरक्षकाची गरज, ‘या’ खेळाडूचं सूचक ट्वीट

Washim BJP Mla Lakhan Malik Protest to solve road problems in city

प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट
प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट.
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर.
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल.
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी.
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'.
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात.
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल.
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड.
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना.