AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष पेटला; बड्या नेत्याला पुन्हा डावललं, नव्या वादाला तोंड फुटलं

भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष पेटल्याचे समोर येत आहे. धाराशिवमधील बड्या नेत्याला डावलल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष पेटला; बड्या नेत्याला पुन्हा डावललं, नव्या वादाला तोंड फुटलं
bjp flag news Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 06, 2026 | 10:35 AM
Share

धाराशिव भाजपमधील अंतर्गत धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना डावलल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. राणा जगजितसिंह पाटील यांना पुन्हा एकदा डावलण्यात आल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील भाजपमधील अंतर्गत वाद काही थांबण्याचे नाव घेत नसल्याचे समोर येत आहे. या वादामुळे धाराशिवमधील दोन नेत्यांमध्ये सुप्त संघर्ष सुरू असल्याची चर्चा आहे.

भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि विधानपरिषद आमदार बसवराज पाटील यांच्या गटांमध्ये सुप्त संघर्ष असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी बसवराज पाटील यांच्या सत्कार कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका आणि बॅनरवरून राणाजगजितसिंह पाटील यांना डावलण्यात आले होते. त्यानंतर आता उमरगा तालुक्यातील मुरूम येथे आज शरण पाटील फाउंडेशनच्या वतीने आयोजित मुख्यमंत्री आरोग्य शिबिराच्या बॅनरवरही राणा जगजितसिंह पाटील यांचा फोटो आणि कार्यक्रम पत्रिकेत नाव नसल्याचे समोर आलं आहे.

विशेष म्हणजे, बॅनरवर भाजपच्या इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांचे आणि नेत्यांचे फोटो असताना राणा जगजितसिंह पाटील यांचा फोटो नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आज सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. त्यात बॅनरवर राणा जगजितसिंह पाटील यांचा फोटो नसल्याने धाराशिवमधील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.

मराठा समाजाचं राणा जगजितसिंह यांच्या घरासमोर आंदोलन

मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मनोज जरांगे यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला सुरुवात केली आहे. परंतु मराठा आरक्षणाच्या मागणीकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याच्या आरोपावरून आंदोलक आक्रमक झाले आहेत. याचे पडसाद धाराशिवमध्येही पाहायला मिळाले. दोन दिवसांपूर्वी धाराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर मराठा समाजाने ठिय्या आंदोलन केलं. सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्याचबरोबर जरांगे यांच्याकडे शिष्टमंडळ पाठवून सरकार फसवणूक करत असल्याचाही आरोप आंदोलकांनी केलाय.

Follow Us
जरांगेंच्या उपोषणाचा आज नववा दिवस; तब्येत आणखी खालावली, मात्र...
Manoj Jarange Patil | जरांगेंच्या उपोषणाचा आज नववा दिवस; तब्येत आणखी खालावली, मात्र...
बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्याचा सत्कार; चांदीचे कडं देऊन...
बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्याचा सत्कार; चांदीचे कडं देऊन... संग्राम भंडारेंनी केली अजब घोषणा
काँग्रेस पक्षाला मोठा धक्का! झारखंड सरकारमधील बड्या मंत्र्याचे निधन,
काँग्रेस पक्षाला मोठा धक्का! झारखंड सरकारमधील बड्या मंत्र्याचे निधन, कारण...
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा