AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, उमेदवारीवरून राडा झाल्यानेच…राजकारणात मोठी खळबळ

विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख आहे. पुण्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ऐनवेळी पक्षात प्रवेश केलेल्या विक्रम काकडेंना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील निष्ठावंताची खदखद समोर आली आहे.

मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, उमेदवारीवरून राडा झाल्यानेच...राजकारणात मोठी खळबळ
Sunetra Pawar Pune MLC CandidateImage Credit source: Google
| Updated on: Jun 01, 2026 | 2:51 PM
Share

विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख आहे. पुण्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ऐनवेळी पक्षात प्रवेश केलेल्या विक्रम काकडेंना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील निष्ठावंताची खदखद समोर आली आहे. राष्ट्रवादीचे पर्वती विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष रामदास गाडे पाटील यांनी राजीनामा दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

रामदास गाडे यांचा राजीनामा

महायुतीच्या जागावाटपात राष्ट्रवादीला पुणे आणि कोकणची जागा मिळाली आहे. पुण्यातून विक्रम काकडेंना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे काकडे हे अलिकडेच पक्षात दाखल झालेले आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाल्याने राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याच नाराजीतून रामदास गाडे यांनी कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

काय म्हणाले रामदास गाडे?

पुण्यातील पर्वती विधानसभा मतदार संघाचे कार्याध्यक्ष रामदास गाडे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा देताना म्हटले की, ‘निष्ठावंतांना पक्षांमध्ये स्थान नसल्याने मी माझ्या कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. यापूर्वी संजय काकडे यांनी राष्ट्रवादी फोडण्याचे काम केलं. त्याच संजय काकडे यांच्या मुलाला उमेदवारी देणे हे चुकीचं आहे. विक्रम काकडे यांना उमेदवारी दिली असल्यामुळे मी माझ्या कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.’

सुनील टिंगरेही अर्ज दाखल करणार

पुण्यातून विक्रम काकडे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. तर सुनील टिंगरे हे डमी उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर अर्जांची छानणी होणार आहे. त्यानंतर सुनील टिंगरे हे आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्याचा राजकारणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी 2 जागा लढवणार

दरम्यान, महायुतीच्या जागावाटपात राष्ट्रवादीच्या वाट्याला दोन जागा आल्या आहेत. तर भाजप 11 आणि शिवसेना 4 जागांवर निवडणूक लढवत आहे. राष्ट्रवादीने पुण्यातून विक्रम काकडे यांना उमेदवारी दिली आहे, तर कोकणातून अनिकेत तटकरे हे निवडणूक लढवत आहेत.

पुण्यातून दोन जण अर्ज दाखल करणार

Follow Us
पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल ठाकरेंचा इशारा
Uddhav Thackeray | पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल! उद्धव ठाकरेंचा सज्जड इशारा
विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले!
Sanjay Gaikwad | विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले! संजय गायकवाडांविरोधात आरती आंबींची पोलिसांत तक्रार दाखल
पुण्याच्या पायाभूत सुविधांचा विकास आणि आधुनिक शहर निर्मितीचे फडणवीसांच
पुण्याला वेगवान गतिशीलता असलेलं शहर बनवणार
नागपुरात डीजेच्या आवाजावर पोलीस ॲक्शन मोडवर
नागपुरात डीजेवरील बंदीनंतर पहिली कारवाई
आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत
आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत
बापटांची मराठी ट्रेंडिंग-सीएम फडणवीस
'बापटांची मराठी ट्रेंडिंग,मला ट्यूशनच घ्यावी लागेल'-सीएम फडणवीस
शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! काकडेंच्या दौऱ्याने...
NCP | शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! विक्रम काकडेंच्या दौऱ्याने राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांना वेग
बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! ठाकरेंचा भाजपवर घणाघात
Uddhav Thackeray | बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! ठाकरेंचं मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray | दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य; राम कदमांचा थेट सवाल
मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक
Delhi | मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक; दिल्लीच्या संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर मोठं आंदोलन