AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! भाजपकडून कुणाला संधी? थेट दिल्लीत खलबतं, 48 नावांची यादी घेऊन रवींद्र चव्हाण नितीन नबीन यांच्या भेटीला

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. आता उमेदवारीचा फैसला दिल्लीतून होणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेतली आहे.

मोठी बातमी! भाजपकडून कुणाला संधी? थेट दिल्लीत खलबतं, 48 नावांची यादी घेऊन रवींद्र चव्हाण नितीन नबीन यांच्या भेटीला
MLC Election BJP CandidateImage Credit source: TV 9 Marathi
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 27, 2026 | 3:12 PM
Share

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. आता उमेदवारीचा फैसला दिल्लीतून होणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेतली आहे. यावेळी चव्हाण यांनी भाजपकडून इच्छुक असलेल्या एकूण 48 नावांची यादी पक्ष नेतृत्वाकडे दिली आहे. आता आगामी काळात यातील काही नावांवर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे भाजपकडून कुणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

48 नावांची यादी दिल्ली दरबारी

गेल्या काही दिवसांपासून विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. एकूण 17 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत भाजप 11 जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या जागांसाठी भाजपकडून अनेकजण इच्छुक आहेत. अशातच आता एकूण 48 जणांच्या नावाची यादी घेऊन रवींद्र चव्हाण दिल्लीला गेले आहेत. ही यादी त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्याकडे सोपवली आहे. आता केंद्रीय नेतृत्व यावर चर्चा करून लवकरच उमेदवारांच्या नावांची घोषणा करणार आहे.

अद्याप जागावाटप ठरलेले नाही

अद्याप महायुतीचे जागावाटप ठरलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या फॉर्म्युलात भाजपने स्वतःकडे 11 जागा ठेवून शिवसेनेला 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस सुनेत्रा पवार गटाला 2 जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र आता हा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांना मान्य नसल्याचे समोर आले आहे. शिवसेनेने किमान 6 ते 7 जागांची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे अद्याप जागावाटप अंतिम होऊ शकलेले नाही.

जागावाटपाबाबत एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्ली गाठत अमित शाह यांच्या मध्यस्थीची मागणी केली आहे. विशेषतः ठाणे आणि नाशिक या जागा शिवसेनेसाठी प्रतिष्ठेच्या असून, तिथून कोणत्याही परिस्थितीत माघार न घेण्याची रणनीती एकनाथ शिंदेंनी आखली आहे. त्यामुळे आता दिल्लीतील या हाय-प्रोफाइल भेटीनंतर अमित शाह कोणता तोडगा काढतात आणि महायुतीचा अंतिम जागावाटपाचा फॉर्म्युला काय ठरतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट