AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL सारखी पेपरची बोली लावा म्हणजे… MMRD परीक्षेवरून अभिजीत दिपके संतापले, गंभीर आरोप काय?

MMRD Exam : अभिजीत दिपके यांनी MMRD परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. अभिजीत दिपके यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

IPL सारखी पेपरची बोली लावा म्हणजे... MMRD परीक्षेवरून अभिजीत दिपके संतापले, गंभीर आरोप काय?
abhijeet dipke on mmrd examImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 21, 2026 | 5:57 PM
Share

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके हे दिल्लीतील यशस्वी आंदोलनानंतर देशातील शिक्षण व्यवस्था सुधारण्यावर भर देत असल्याचे समोर आले आहे. नीट पेपरफुटीनंतर सुरू झालेल्या आंदोलनाला संपूर्ण देशातून पाठिंबा मिळाला होता. अशातच आता अभिजीत दिपके यांनी MMRD परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. अभिजीत दिपके यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

16 पैकी 13 टॉपर एकाच सेंटरवरील

अभिजीत दिपके यांनी म्हटले की, MMRD मध्ये परीक्षा दिलेले विद्यार्थी काही दिवसापूर्वी माझ्याकडे आले होते. जी परीक्षा झाली आहे त्याबद्दल खूप मोठा प्रश्न निर्माण होत आहे. ज्याला सिडकोच्या परीक्षेत 80 मार्क मिळाले होते तो इथे टॉपर आहे. सिडकोच्या परीक्षेत 200 पैकी 88 मार्क मिळालेल्या विद्यार्थ्याला MMRD मध्ये 184 मार्क्स मिळाले. धक्कादायक गोष्ट म्हणजे 16 टॉपर पैकी 13 टॉपर एका सेंटरवरचे आहेत. जे जास्त अभ्यास करतात त्यांना एकच सेंटर भेटतं असं काही नाही. तसेच एकच सेंटर भेटल्यावर सरस्वती प्रसन्न होते आणि तुम्ही हुशार होता असंही काही नाही.

पेपरची आयपीएलसारखी बोली लावा…

पुढे बोलताना दिपके यांनी म्हटले की, 16 पैकी 13 टॉपर एकाच सेंटरवरचे आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी काहीतरी गडबड झाली आहे, काहीतरी सेटिंग झाली आहे. बॉम्बे हायकोर्टाची जी परीक्षा झाली होती तिथे सुद्धा फॉल्टी सेंटर निवडण्यात आले होते. जी मुलं टॉपर आहेत त्याच्यात काही अधिकाऱ्यांची मुलं आहेत. याची जुडेशील चौकशी करण्यात यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे, कारण SIT वर लोकांचा भरोसा नाही. आयपीएलमध्ये जशी बोली लावतात तशी परीक्षेची बोली लावा म्हणजे विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाणार नाही.

घोटाळा करणाऱ्यांची चौकशी करा…

MMRD परीक्षा दिलेल्या एका विद्यार्थीनीने सांगितले की, परीक्षा घ्या म्हणून आम्हाला आंदोलन करावं लागतं, पुन्हा निकाल लावा म्हणून आंदोलन करावं लागतं. पुणे महानगरपालिकेत सुद्धा घोटाळा झाला आहे, आमचे तिथे सुद्धा आंदोलन सुरू आहे. आम्ही हेच काम करत बसलो तर अभ्यास कधी करायचा, ज्या मुलांनी फ्रॉड केला त्यांची चौकशी करा. जे पण हे 19-20 मुले आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट