AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर तुम्ही काहीही करू शकणार नाही; राज ठाकरेंची मूर्तीकारांना धोक्याची सूचना

त्यामुळे त्यावर तुम्ही वेगळा विचार केला पाहिजे," असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. (Raj Thackeray comment after meeting with Pen Idol Maker Delegation)

...तर तुम्ही काहीही करू शकणार नाही; राज ठाकरेंची मूर्तीकारांना धोक्याची सूचना
| Updated on: Oct 07, 2020 | 12:40 PM
Share

मुंबई : “प्लॅस्टर ऑफ परिसच्या मूर्त्या विसर्जनानंतर पुन्हा किनाऱ्यावर येतात. ते चित्र फार भीषण असतं. त्या पटकन विरघळत नाही. त्यामुळे त्यावर तुम्ही वेगळा विचार केला पाहिजे,” असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.  केंद्राने प्लॅस्टर ऑफ परिसवर बंदी घातली आहे. त्यामुळे मूर्ती घडवणं मूर्तीकारांना कठीण झालं आहे. या पार्श्वभूमीवर ही बंदी उठवावी, या मागणीसाठी पेणमधील मूर्तीकारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. (Raj Thackeray comment after meeting with Pen Idol Maker Delegation)

“तुम्ही एक वेगळा विचार करुन बघा, होतंय का? जमतं का? पण मी तुम्हाला एक धोका सांगून ठेवतो, जर उद्या परदेशातून मूर्त्या आल्या तर तुम्ही काहीही करु शकत नाही,” अशी धोक्याची सूचना राज ठाकरेंनी मूर्तीकारांना दिली.

“POP मुळे नदी, समुद्र यात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. ते पटकन विरघळत नाही. विसर्जनानंतर तुम्ही जर कोणत्याही चौपाट्या बघितल्या तर त्यावर असंख्य गणपतीच्या मूर्त्या दिसतात. हे चित्र फार भीषण असतं. आपण इतक्या श्रद्धेने त्या गणपती बाप्पाचे पूजन करतो. त्याचे विसर्जन करतो. दुसऱ्या दिवशी त्या मूर्त्या पुन्हा किनाऱ्याजवळ आलेल्या असतात. ते दृष्य बघायला खूप विदारक असतं. त्यामुळे अशावेळी जेवढ्या जमेल तेवढ्या शाडूच्या किंवा मातीच्या मूर्ती बनवणं हे जास्त संयुक्तिक असेल,” असंही राज ठाकरे म्हणाले.

“पीओपीच्या मूर्त्या आपण आतापर्यंत केल्या आहे. मात्र त्याचे दुष्परिणामही समोर आले आहेत. त्यावर तुम्ही काहीतरी वेगळा मार्ग काढला पाहिजे. समुद्रात किंवा नदीत त्याचे विघटन लवकर होईल. तुमचं कामही सोयीचं होईल, असेही राज ठाकरेंनी सांगितले.  (Raj Thackeray comment after meeting with Pen Idol Maker Delegation)

“मी सरकारशी याबाबत बोलेन”

तुमच्या मूर्त्यांमुळे जलाशयात प्रदूषण होतं असा काही भाग नाही. पण त्यात हा देखील एक भाग आहे. त्यामुळे त्याच्यावर विचार करुन मार्ग काढता आला. त्यामुळे यावर तुम्ही वेगळा विचार केला पाहिजे. पीओपीची मूर्ती विरघळण्यास आठ दिवस जातात.

तुम्ही मूर्ती बनवण्याच्या दृष्टीने वेगळा काही मार्ग निघतो का याचा विचार करा. त्यासोबतच मी सरकारमधील कोणी व्यक्ती असेल त्याच्याशी चर्चा करतो की समुद्रात विसर्जनासाठी याचा काही वेगळा पर्याय होतील का. तोपर्यंत मी बोलून घेतो, असे आश्वासनही राज ठाकरेंनी मूर्तीकारांच्या शिष्टमंडळाला दिले.

राज ठाकरेंना आतापर्यंत कोण कोण भेटलं?

  • मूर्तीकार
  • डबेवाले
  • जिमचालक
  • कोळी महिला
  • वीजबिल ग्राहक
  • पुजारी
  • डॉक्टरांचे शिष्टमंडळ
  • ‘अदानी’चे अधिकारी राज ठाकरेंच्या भेटीला! (Raj Thackeray comment after meeting with Pen Idol Maker Delegation)

संबंधित बातम्या : 

केंद्राने POP वरील बंदी उठवावी, मूर्तीकारांचं शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला

डोंगरीतील कोळी महिला ‘कृष्णकुंज’वर, परप्रांतीय मासेविक्रेत्यांना हटवण्यासाठी राज ठाकरेंना साकडे

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.