वडील वारल्याचं समजलं, खिशात भाड्यालाही पैसे नव्हते, पण नंतर मुलगा कलेक्टर झाला

रमेश घोलप यांचं अधिकारी बनण्याआधीचं आयुष्य आणि आताच आयुष्य यात खूप फरक आहे. घोलप यांनी प्रचंड गरिबीतून दिवस काढले. खूप यातना सोसल्या. वेळप्रसंगी मन मारलं. पण घोलप हरले नाहीत. ते लढले आणि जिंकले.

वडील वारल्याचं समजलं, खिशात भाड्यालाही पैसे नव्हते, पण नंतर मुलगा कलेक्टर झाला
फोटो सौजन्य : IAS रमेश घोलप यांचं ट्विटर अकाउंट
Follow us
| Updated on: May 03, 2023 | 9:03 PM

मुंबई : सध्याची परिस्थिती खूप बेताची आहे. प्रचंड संघर्ष आहे. नियती खूप परीक्षा घेतेय. अशा परिस्थितीत फक्त उभं राहणं जास्त महत्त्वाचं आहे. पण फक्त उभं राहण्यात अर्थ नाही. कारण आपण परिस्थितीला सामोरं जाणं, तोंड देणं हे पाऊल महत्त्वाचं आहेच. पण यातून फक्त आपण एक-एक दिवस पुढे ढकलतोय. आजचं मरण उद्यावर ढकलत रोज जिवंतपणी मरणयातना सोसतोय. आपण संघर्षाच्या या प्रवासात फक्त पिळलो जातोय, असं व्हायला नको. आपण या संघर्षाच्या या वणव्यातून तापून सुलाखून बाहेर निघायला हवं. आयुष्यातील वैशाख वणव्याचे चटके सोसल्यानंतर वसंताची सुंदर पहाट यायला हवी. त्या पहाटसाठी आपण परिस्थितीशी लढायला हवं, संघर्ष करायला हवा.

विशेष म्हणजे आपण झोकून देऊन खरंच परिस्थितीशी दोन हात केले तर आपल्या आयुष्यातील वसंताला बहर येईल. सारं काही आलबेल होईल. आपले आईवडील, आजी-आजोबा, भावंड यांना आपला अभिमान वाटेल. असं यश संपादित करणारी माणसं या जगात आहेत. त्यातलं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे IAS अधिकारी रमेश घोलप!

स्पर्धा परीक्षा पास होणं हे सोपं नसतं. देशभरात लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात. त्यामुळे ही परीक्षा खूप आव्हानात्मक असते. पण तरीही लाखो विद्यार्थी आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवून अभ्यास करतात. त्यापैकी अनेक जण आपल्या मेहनतीच्या बळावर परीक्षा पास होतात. असे यशस्वी विद्यार्थी खरंतर खूप खडतर प्रवास करुन तिथपर्यंत आलेले असतात. अनेकांच्या घरची परिस्थिती बेताची असते. आयएएस अधिकारी रमेश घोलप हे त्यापैकीच एक अधिकारी आहेत.

हे सुद्धा वाचा

लहानपणीच पोलिओची बाधा

रमेश घोलप यांचं अधिकारी बनण्याआधीचं आयुष्य आणि आताच आयुष्य यात खूप फरक आहे. घोलप यांनी प्रचंड गरिबीतून दिवस काढले. खूप यातना सोसल्या. वेळप्रसंगी मन मारलं. पण घोलप हरले नाहीत. ते लढले आणि जिंकले. म्हणून घोलप यांचं नाव अनेकांकडून अभिमानाने काढलं जातं. आयएएस अधिकारी रमेश घोलप यांना लहानपणीच पोलिओची बाधा झाली होती. रमेश लहान यांच्या डाव्या पायाला पोलिओ झाला होता. पण तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांची घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यामुळे ते लहानपणी आपल्या आईसोबत रस्त्यावर बांगड्या विकायला जायचे.

आईसोबत बांगड्या विकल्या

रमेश घोलप यांचा कुटुंबात चार जण होते. रमेश यांचे वडील एक छोटसं सायकलचं दुकान चालवायचे. पण त्यांना दारु पिण्याचं व्यसन होतं. त्यामुळे ते कमवलेले पैसे व्यसनातच खर्च करत होते. त्यांच्या अशा प्रकारच्या वागणुकीमुळे कुटुंबाला प्रचंड आर्थिक अडचणीतून जावं लागलं. जास्त दारु प्यायल्याने रमेश यांच्या वडिलांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं.

अशा परिस्थितीत कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी रमेश आणि त्यांच्या आईवर येऊन पडली. आपला उदरनिर्वाह भागवण्यासाठी रमेश यांच्या आईला बांगड्या विक्रीचा व्यवसाय सुरु करावा लागला. रमेश यांच्या डाव्या पायाला पोलिओ झालेला असताना रमेश आपल्या आईसोबत बांगड्या विकायला जात असत.

वडिलांचं निधन झालं तेव्हा घरी जायला पैसे नव्हते

रमेश घोलप यांचं सुरुवातीचं शालेय शिक्षण हे आपल्या गावातच झालं होतं. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी आपल्या काकांकडे बार्शी येथे गेले. रमेश 12 वी ला असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. वडिलांचं निधन झाल्याचं समजल्यानंतर रमेश यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांना कोणत्याही परिस्थितीत आपल्या घरी पोहोचयाचं होतं. काकांच्या घरापासून रमेश यांच्या घरी जाण्यासाठी त्यावेळी 7 रुपये इतका खर्च यायचा. रमेश दिव्यांग असल्याने त्यांना 2 रुपये इतका खर्च यायचा. पण तितकेही रुपये रमेश यांच्याकडे त्यावेळी नव्हते. रमेश यांची इतकी विदारक आर्थिक परिस्थिती होती.

बारावीच्या शिक्षणानंतर शिक्षक म्हणून नोकरी

इयत्ता बारावीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर घराची जबाबदारी पार पाडण्यासाठी रमेश यांनी एका डिप्लोमाचं शिक्षण केलं. त्यानंतर त्यांनी गावात शिक्षक म्हणून काम सुरु केलं. या दरम्यान त्यांनी आपलं शिक्षणही सुरु ठेवलं. त्यांनी आपलं बीए डिग्रीचं शिक्षण पूर्ण केलं.

…आणि अखेर रमेश घोलप आयएएस बनले

रमेश यांनी यूपीएससीच्या तयारीसाठी 6 महिन्यांसाठी नोकरी सोडली होती. त्यांनी झोकून देऊन यूपीएससीचा अभ्यास केला. त्यांनी 2010 मध्ये यूपीएससीची परीक्षा पहिल्यांदा दिली होती. त्यानंतर त्यांच्या आईने गावकऱ्यांकडून पैसे उधार घेऊन रमेश यांना बाहेर शिक्षणासाठी पाठवलं होतं. रमेश यूपीएससीच्या शिक्षणासासाठी पुण्यात आले होते. त्यांनी प्रचंड मेहनत, जिद्दीने अभ्यास केला. त्यामुळे 2012 मध्ये त्यांना स्पर्धा परिक्षेत यश आलं. ते 2012 मध्ये दिव्यांग कोट्यातून 287व्या रँकने आयएएस अधिकारी बनले.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.