AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्यातील चार गाड्यांचा अपघात

श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्यातील चार गाड्यांचा अपघात झाला आहे. श्रीकांत शिंदे हे नांदेडच्या दौऱ्यावर होते. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु अपघातामुळे गाड्यांचे नुकसान झाले आहे.

मोठी बातमी! श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्यातील चार गाड्यांचा अपघात
mp shrikant shinde convoy four car accidentImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 28, 2026 | 3:38 PM
Share

Shrikant Shinde Convoy Accident : खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्यातील चार गाड्यांचा अपघात झाला आहे. श्रीकांत शिंदे हे नांदेडच्या दौऱ्यावर होते. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु अपघातामुळे गाड्यांचे नुकसान झाले आहे. ते नांदेडमध्ये शिवसंवाद यात्रेवर होते. यावेळीच त्यांच्या ताफ्यात असलेल्या गाड्यांच्या अपघात झालेला आहे.

अपघात नेमका कसा झाला?

मिळालेल्या माहितीनुसार श्रीकांत शिंदे यांचा ताफा नांदेडहून नायगावकडे जात होता. याच वेळी समोरून एक गाडी आली आणि ताफ्यातील चार गाड्या एकमेकांवर आदळल्या. यावेळी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु ताफ्यातील गाड्यांचे नुकसान झाले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार ताफ्याती अपघात झालेल्या गाड्यांमध्ये श्रीकांत शिंदे यांचे काही कार्यकर्ते होते. तसेच आरोग्य विभागातील काही कर्मचारी होते. गाड्या एकमेकांवर आदळलेल्या असल्या तरी यात कोणीही जखमी झालेले नाही.

स्थानिक प्रश्नांवर तत्काळ पाठपुरावा करावा

दरम्यान नांदेडच्या दौऱ्यावर असताना त्यांनी नायगाव, मुखेड आणि देगलूर विधानसभा आढावा बैठक घेतली. यावेळी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी, बूथनिहाय नियोजन, ग्रामीण भागातील पक्ष विस्तार आणि जनसंपर्क अभियान या विषयांवर यावेळी सखोल चर्चा करण्यात आली. तसेच प्रत्येक गाव, वाडी आणि घराघरापर्यंत शिवसेनेचा विचार पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने मैदानात उतरावे, जनतेमध्ये सातत्याने संपर्क ठेवावा आणि स्थानिक प्रश्नांवर तत्काळ पाठपुरावा करावा, अशा सूचना यावेळी श्रीकांत शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केल्या.

शिवसेना केवळ पक्ष नाही, तर सामान्य माणसाच्या हक्कासाठी लढणारी ताकद आहे. ही ताकद आणखी मजबूत करायची असेल, तर प्रत्येक शिवसैनिकाने पूर्ण क्षमतेने आणि प्रामाणिकपणे कामाला लागणे गरजेचे आहे,” असे आवाहन यावेळी श्रीकांत शिंदे यांनी केले. तसेच एसआयआर मोहिमेअंतर्गत मतदार यादी अद्ययावत ठेवणे, नवीन मतदार नोंदणी, युवा मतदार आणि लाभार्थ्यांशी थेट संपर्क वाढवणे, तसेच प्रत्येक बूथवर संघटनेची ताकद वाढवणे यावर विशेष भर देण्यात आला. बीएलए, शाखाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांनी बूथस्तरावर अधिक सक्रिय राहून संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने काम करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. आगामी निवडणुकांमध्ये विजय मिळवायचा असेल, तर सर्वांनी पूर्णपणे झोकून देऊन काम करणे फार महत्वाचे असल्याचे मत यावेळी व्यक्त करत सर्वांनी पक्षबांधणीसाठी जोमाने काम करावे असेही त्यांनी सांगितले.

Follow Us
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेचा तपास...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेच्या तपासाला वेगळेच वळण
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या, बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर
टायगर श्रॉफच्या गाडीवर धाडधाड गोळ्या झाडल्या, पण कारण काय? बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर!
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? भारताच्या सर्वोच्च न्यायालयात...
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? सर्वोच्च न्यायालयात... नेमका निर्णय काय?
भिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून..
Tiger shroff Video : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा पहिला थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून आलेले तिघं...
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
Latest Update : अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा,
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा, इतर योजनांमधील निधी...
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार,
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार, म्हणाले एक्सपायरी डेट जवळ आली
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,