AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारामती विधानसभा पोटनिवडणुक बिनविरोध होणार? सुप्रिया सुळे यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट..

बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीकडे राज्याच्या नजरा आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, याकरिता प्रयत्न केले जात आहेत. मात्र, काँग्रेसने या निवडणुकीत उमेदवार दिल्याने संपूर्ण समीकरणे बदलल्याचे बघायला मिळत आहे.

बारामती विधानसभा पोटनिवडणुक बिनविरोध होणार? सुप्रिया सुळे यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट..
Supriya Sule
| Updated on: Apr 09, 2026 | 11:14 AM
Share

अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीमध्ये विधानसभेची पोटनिवडणुक आहे. ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, असा प्रयत्न केला जात आहे. महायुतीकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. काँग्रेसकडून या निवडणुकीत उमेदवार देण्यात आला. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, याकरिता प्रयत्न केली जात आहेत. यादरम्यान आमदार रोहित पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ याची आजच भेट घेतली. बारामती पोटनिवडणुकीत नक्की काय घडते याकडे सर्वांच्या नजरा आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर चार दिवसांनी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्या या शपथविधीबद्दल शरद पवार यांना कोणीतीही कल्पना नव्हती. सुनेत्रा पवार पोटनिवडणुकीचा अर्ज भरण्याकरिता ज्यावेळी आल्या, त्यावेळी पार्थ पवार आणि जय पवार यांच्याशिवाय पवार कुटुंबातील कोणीही उपस्थित नव्हते.

बारामती पोटविधानसभेच्या निवडणुकीबद्दल नुकताच सुप्रिया सुळे यांनी मोठे विधान केले. सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यात बैठक झाली. रोहित पवार यांनी मनापासून दिलगिरीही व्यक्त केली. काँग्रेसबद्दल जे काही वक्तव्य झाले, त्याबद्दल. काही चूक, भूल असेल तर माफ करा, असे म्हटले.

पार्थ पवार याच्याबद्दल बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, आत्या म्हणून जे काही सांगायचे असते ते घरात सांगायचे असते… कॅमेऱ्यावर नाही. सुनेत्रा पवार यांनी काल हर्षवर्धन सपकाळ यांना काल फोन केल्यावरून बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, मला याबाबत काही कल्पना नाही. माझे काल कोणाशीही बोलणे झाले नाही.

बारामतीबद्दल अजून काही चर्चा झाली नाही. निवडणुकीबद्दल जो काही निर्णय असेल तो काँग्रेसचा असेल असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले. सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आले की, बारामतीची निवडणूक झाली तर सुनेत्रा पवार यांच्याकरिता तुम्ही प्रचाराच्या मैदानात उतरणार का? यावर सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, अजून काही ठरले नाही. रोहित पवार यांनी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी अगोदरच व्यक्त केली आहे.

Follow Us
सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत....
Sanjay Raut : सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत स्पष्टच म्हणाले....
धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
Dharashiv FDA Action : धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय?
Mahayuti : महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय घडतंय?
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
FDA : 10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती, FDA च्या पाच अधिकाऱ्यांवर थेट...
आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
CJP Protest : आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
Malegaon Case | डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला..
Mahayuti : फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला पाठिंबा, नेमकं प्रकरण काय?
दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे....
CJP Tiranga Rally : दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे देशाचं लक्ष
ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम